जिवन प्राधिकरणाच्या दुर्लक्षपणामुळे पिण्याच्या पाण्यात आढळला नारु सदृश्य कीडा..‌

  युवराज डोंगरे 

उपसंपादक/खल्लार

       जिवन प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे दर्यापूर येथिल सैनिक कॉलोनी वसाहती परिसरात 5 ते 6 इंच लांबीचा नारु सदृश्य किडा आढळून आला.

         सैनिक कॉलनी येथिल रहिवासी सुरज वाकपांजर यांच्या घरी आज दि‌.22 ऑगस्ट रोजी पिण्याचे पाणी भरीत असतांना पाण्यात हा किडा सापडला.

         जिवन प्राधिकरणाच्या निष्काळजीपणा मुळे असे प्रकार घडत आहेत.सदर किडा हा प्राधिकरण कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

        यावेळी नागरिक हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष ऍड. संतोष कोल्हे,प्रहार जनशक्तीचे प्रदीप वडतकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

        यापुढे असे प्रकार घडू नये व पाणी शुद्धीकरण्याकडे जिवन प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्यास कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.