लोकशाहीत जनता म्हणजे निरागस रांगतं बाळ…. — वैचारिक लेखमालेचा अंतिम भाग ६….

         लोकशाहीतील जनतेला म्हणजे निरागस रांगत्या बाळालाच आता निरागस्वातून बाहेर येऊन संविधान जागृतीतून आणि अनुभवातून लोकशाही वाचविण्यासाठी दूर….. दूरदृष्टीच्या स्वार्थासाठी का असेना स्वतःच सर्व वडीलधाऱ्या मंडळीना वठणीवर आणण्यासाठी दोन पायावर उभे राहून धावावं लागणार आहे..

   याशिवाय अन्य पर्यायच दिसत नाही…

        मागील 5 भागात आपण बघितलं की , लोकशाहीचे चारही आधारस्तंभांनी आपल्या घटनात्मक आणि नैतिक कर्तव्याला तिलांजली देऊन मला ( जनतेला ) सांभाळण्यासाठी भांग खाऊ घालून तळपत्या उन्हात सोडून दिले , की जेणेकरून त्या नशेत मी राहावं आणि नुसतं पडून राहावं. जेणेकरून पडण्याचा धोका राहणारच नाही…

        आणि खुशाल ही सर्व मंडळी मला सांभाळण्याच्या जबाबदारीतून मुक्त झाली. पण आता माझ्या भांगेची नशा 75 वर्षात संपल्यामुळे मला आता जाणीव होऊन मी यांना त्यांची जागा दाखवीण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. म्हणून मी आता चार पाय टाकून देऊन दोन पायानी धावण्यास सज्ज होणार आहे…

           येथील धर्माच्या कर्मकांडाने गेल्या 70 वर्षांपासून मला सदविचारी बनण्यापासून थांबवले होते.या चारही वडीलधाऱ्या मंडळींनी मला त्यातच मी कायमस्वरूपी कसा अटकून राहीन याची व्यवस्थितपणे अव्यवस्था निर्माण केली होती. त्यासाठी घटनाकाराने संविधानातील अनुच्छेद क्रमांक 47 चा जो समावेश केलेला आहे, त्याचे उल्लंघन यां व्यवस्थेने व्यवस्थित करून मी कायम नशेतच राहावं म्हणून अल्कोहोल निर्मितीचा महापूर यांनी निर्माण केला, जेणेकरून मी ( जनता म्हणजेच बाळ ) कायमस्वरूपी नशेतच राहावं..

        परंतू,माझे डोळे गेल्या 75 वर्षातील नशेतून आता मात्र मी कायमचे उघडलेत….

       आणि या सर्वच वडीलधाऱ्या मंडळीना त्यांच्याच नैतिक व घटनात्मक कर्तव्याची नुसती जाणीवच नव्हे तर ती भूमिका मीच वठवणार आहे.हीच माझ्यातील आत्मक्रांती असेल…. 

          कारण…..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

    यांना येथील व्यवस्थेने ( जी साम, दाम, दंड आणि भेदावर आधारित आहे ) जीवनभर छळले असतांना,प्रखर विरोध केलेला असतांना,केवळ आणि केवळ हे………

रांगतं बाळ ..‌

    हे लवकरात लवकर सुदृढ आणि गोंडस होऊन संविधान जागृतीतून स्वावलंबी होण्यासाठीच कुठेही सुडाची व बदलाची भावना मनात न ठेवता, माझ्यासाठी विवेकवादी + विज्ञानवादी = मानवतावादी बनण्यासाठीच या…

     भारतीय संविधानाची निर्मिती केवळ माझ्यासाठीच केली…..

        त्याचप्रमाणे तत्कालीन संविधान सभेने सुद्धा हे संविधान स्वतःप्रत अधिनियमित आणि अंगीकृत करून घेण्याची जी शपथ घेतली, तीच शपथ आज, उद्या आणि नेहमीच कोणत्याही काळाला लागू होणारी असल्यामुळे माझ्या कर्तव्यात मोठी वाढ झालेली आहे.

           आज 2024 च्या काळात आणि इथून पुढे कायमस्वरूपी जर मला ( जनतेला ) प्रथम कोणते जबाबदारीने सार्वजणिकतेने कर्तव्य पार पाडायचे असेल, तर ते म्हणजे मला या संविधानाला जाती – धर्माच्या व राजकारणाच्या पलीकडे जाऊन समजून घेऊन कर्तव्याने सिद्ध होणे..

         त्यानंतर या मुख्य निवडणूक आयोगाने आमच्या मूलभूत हक्क असलेल्या मताचा अधिकार ज्या EVM + VVPAT ने हिरावून घेण्यास भाग पाडले , तीला जगाच्या वेशिवर टांगायला मुख्य निवडणूक आयोगाला भाग पाडणे.

       त्यानंतर भ्रष्टाचार बंदीसाठी सर्वप्रकारच्या खोट्या विकास योजना ज्या केवळ टक्केवारीसाठीच निर्माण झाल्या,त्या विकास योजना पहिले बंद करण्यास भाग पाडणे…

       त्यानंतर,कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही कितीही मोठ्यात मोठ्या नेत्याला आपले सर्वस्व अर्पण करून लोटांगण घालण्याची प्रथा बंद पाडली पाहिजे,जेणेकरून लोकशाहीला अत्यंत घातक असलेली “विभूतीपूजा “कायमची नष्ट होईल..

      वरील बाबी साध्य करून घेण्यासाठी आपल्याला (जनतेला) थोडासा त्रास होईल, आपला अहंकार दुखावल्या जाण्याची दाट शक्यता आहे, परंतू हृदय मात्र निश्चितच दुखणार नाही.आणि ही जबाबदारी विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी युवक युवतीची आहे…

      कारण मांजराच्या गळ्यात घंटा तेच बांधू शकतात…

      त्यासाठी आमच्यासारखी ( संविधान जागृतीची कामे करणारी ) मंडळी नेहमी तुमच्यासोबत असणार आहे..

       तुमच्यावर जबाबदारी सोडून आम्ही पळ काढणारे नाही आहोत, उलट तुम्हीच जर जबाबदारी घेत नसाल तर ती जबाबदारी घेण्यासाठी आम्ही ( मी ) समर्थ आहोत..

  कारण संविधानाची शक्ती आम्ही ( मी ) ओळखली म्हणूनच….

         जागृतीचा लेखक

           अनंत केरबाजी भवरे

 संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689..