प्रितम जनबंधु
संपादक
सर्वोच्च न्यायालयाचा 1 ऑगस्ट 2024 चा निर्णय रद्द करण्यासाठी घटना दुरुस्ती करावी,अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे वर्गीकरण व क्रिमिलियरच अट रद्द करावी या करिता आज भारत बंदचे आव्हान करण्यात आले होते. या भारत बंदला देसाईगंज वडसा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मध्ये वर्गीकरणं आणि नॉनक्रिमीलेअर लावण्याबाबत सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णया विरोधात “बहुजन समाज पार्टी” च्यां नेतृत्वात देसाईगंज (वडसा ) येथे अतिशय शिस्तबध्द पद्धतीने निषेध रॅली काढण्यात आली होती आणि महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना “बहुजन समाज पक्षाचे” आरमोरी विधानसभा अध्यक्ष कृपानंद सोनटक्के,उपाध्यक्ष सुधीर मेश्राम तसेच माजी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष वामन राऊत आणि कार्यकर्ते मुकेश खोब्रागडे,विनायक धारगावे,कृणाल लांडगे,आशिष घुटके आणि वडसा नगरीतील अनेक छोटे मोठे सामाजिक संघटन व सामाजिक कार्यकर्ते,तसेच वडसा शहरातील जनतेने सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले.