कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
पारशिवनी :-पारशिवनी येथील अमन सभागृहात येथे आयोजित गुरु शिष्य परंपरेच्या आगळ्या वेगळ्या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षक यांचा गुरु पौर्णिमेच्या दिवशाचे औचित्य साधून विशाल बरबटे रामटेक विधानसभा प्रमुख उबाठा तर्फे यांनी आयोजित प्रेरणादायी उपक्रमांतर्गत गौरविण्यात आले.
गुरु शिष्य यांच्या पवित्र नात्याला बळकटी देण्यासाठी सामाजिक स्तरावर गुरु पौर्णिमेच्या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
गुरु पौर्णिमेच्या दिवशाचे औचित्य साधून श्री विशाल बरबटे रामटेक विधानसभा प्रमुख उबाठा यांनी आयोजित केलेल्या गुरु शिष्य परंपरेच्या आगळ्या वेगळ्या सोहळ्यात विधान सभा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षक यांचा गौरव करुन विद्यार्थ्यी व शिक्षकांना गुरुदक्षिणा म्हणून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तर गुणवत्ता प्राप्त वर्ग १० वी १२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुध्दा गौरविण्यात आले. या गुरु शिष्य परंपरेच्या आगळ्या वेगळ्या सोहळ्यात प्राध्यापक आशीष तायवाडे यांचे कॅरीअर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या दिशा दर्शक ठरले.
या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात पारशिवनी व रामटेक तालुक्यातील २०० पेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या होत्या.
गुरु शिष्य परंपरेच्या आगळ्या वेगळ्या सोहळ्यात कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थानी श्री विशाल बरबटे रामटेक विधानसभा प्रमुख उबाठा हे तर विशेष मार्गदर्शक प्राध्यापक आषीश तायवाडे व प्रमुख सत्कार मुर्ती म्हणून सेवानिवृत्त शिक्षक गोपाल कडू,राजीव तांदूळकर मुख्याध्यापक आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नवेगाव खैरी, प्राध्यापक हेमराज चौखांद्रे या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून कैलास खंडार, पारशिवनी तालुका प्रमुख,रमेश तांदूळकर रामटेक विधानसभा संघटक, सौ. दुर्गाताई कोचे जिल्हा प्रमुख महिला आघाडी,सुनील मस्के पारशिवनी शहर प्रमुख, संजय देसाई, नरेश भोंदे,सुनील डोणारकर,शांताराम ढोंगे,सौ.पुष्पाताई कारामोरे,सौ.निलुताई फुलबांधे, जितेंद्रसिंह जंम्बे,किशोर बावनकुळे,विकास भेंद्रे,सुनील साहारे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुवंदनेने करण्यात आली व राष्ट्र संतांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक विशाल बरबटे रामटेक विधानसभा प्रमुख उबाठा यांनी केले.
कुशल संचालन गजराज देवीया यांनी केले तर,आभार लोकेश बावनकर युवासेना जिल्हा प्रमुख यांनी मानले.