ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली – रक्तदान ही काळाची गरज आहे सर्वांनी रक्तदान केले पाहिजे बऱ्याचदा अपघात झालेल्या व्यक्तीला रक्ताची गरज पडते आणि त्याला वेळेवर रक्त न मिळाल्यास त्याचा जीव जातो.
अशा या काळामध्ये आज जर भंडारा जिल्ह्याची स्थिती पाहिली तर भंडारा जिल्ह्यात रक्त पेढ्यांमध्ये रक्तांचा साठा खूपच कमी आहे.यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच लोकांचा जीवही जातो ही गोष्ट लक्षात घेता महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसांचे अवचित्य साधून साकोली येथे डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी वैनगंगा शिक्षण संस्था च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
या शिबिरामध्ये 97 लोकांनी रक्तदान केले या शिबिरामध्ये भाजपाच्या नेत्यांनी सुद्धा उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला. यामध्ये इंद्रायणी ताई कापगते जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी ताई नेवारे कुंभली जिल्हा परिषद सदस्य वनिताताई डोये यांनी सुद्धा रक्तदान केले.
साकोली विधानसभेत पूर परिस्थिती आणि रेड अलर्ट असूनही विधानसभेतील तरुणांनी भरघोस असा प्रतिसाद डॉ. सोमदत्त करंजेकर यांना दिला.
यावेळी हा भाजयूमोचे सचिव भंडारा जिल्हा राधेश्यामजी मुंगमोडे,विलास जी गहाणे, पुष्करजी करंजेकर,हर्षल राऊत, नरेंद्र गहाणे, नरेंद्र आरसुडे, विवेक भाजीपाले, आशिष भिवगडे, भूमिताताई धकाते, जागृतीताई गहाणे, पूजाताई देशमुख, मनिष कपगते ,डॉ. जितेंद्र ठाकूर, डॉ. सुनील चतुर्वेदी, राकेश करंजेकर, रजत पटले इत्यादींनी सहकार्य केले.