कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
पारशिवनी:- तालुक्यातील कादरी गाव व टेकाडी गाव येथे व कोळशा खाणी वेकोलीच्या आडमुठी आणि सबेएरिया श्री.दीक्षितजी यांच्या नियोजन शून्य धोरणाचे फलित म्हणून पावसामुळे आज ग्राम पंचायत टेकाडी अंतर्गत साधारणतः 50 एकर शेती पाण्याखाली गेलेली आहे.
मातीचे कृत्रिम डोंगर नियम धाब्यावर ठेवून बंद करण्यात आलेले नाले, ज्यामुळे योग्य रित्या पाण्याची निकाशी होत नसल्याने शेतकऱ्यापुढे ही समस्या उदभवलेली आहे.रामटेक लोकसभाचे खासदार श्री.श्यामकूमारजी बर्वे यांनी आज शनिवारी दुपारी २.०० वाजता च्या दरम्यान टेकाडी गावात परिस्थिची पाहणी केली.
तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना महसूल विभागाला देऊन व वारंवार उद्भवणाऱ्या समस्येसंदर्भात वेकाली च्या CMD सोबत बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वास्थ खासदार श्यामकुमार बर्वे यांनी केले.
या प्रसंगी ना जि कांग्रेस कमेटी चे उपाध्यक्ष नरेश बर्वे टेकाडी गावाती ग्रामपंचायती चे रुरपंच उपसरपंच ग्रा प सदस्य महसुल विभाग तील कर्मचारि कोळशा खाणी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.