गरंडा ते हिंगणा व सोनेगाव ला जोडणारा रस्ता व त्याखालील गरांडा गावापासून 750 मीटर अंतरावर बांधलेला खडीकरण रस्ता व पूल पाण्याने वाहून गेला.

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी 

पारशिवनी :- गरंडा ते हिंगणा व सोनेगाव ला जोडणारा रस्ता व त्याखालील गरांडा गावापासून 750 मीटर अंतरावर बांधलेला खडीकरण करूण पूल, वर रस्त्याच्या वर पाईप टाकून बांधण्यात आलेला नाला रविवारी सायकाळी मुसळधार पावसाचे पाणी वाहून गेल्याने संपूर्ण नाला व रस्ता वर चा खडीकरण करण्यात आलेल रास्ते व सिमेंटचे पाईप पाण्यात वाहून गेल्याने हिंगणा व सोनेगाव येथून गरांडा गावातील लोक, शेतकरी व विद्यार्थी ये-जा करत असत.

          शेतकरी त्यांच्या शेतात ट्रॅक्टर बैलबुंडीने जात असत आणि ते दुचाकी वाहने वापरत असत आणि हा रस्ता तीन किलोमीटर लांबीचा आहे. जो महिना भरा पूर्वीच बांधण्यात आला होता.

          पुल व रास्ता पाणी चे तेज प्रवाहात वाहुन गेल्याने गरांडा गावातील नागरिकांची ये-जा करायची, गरांडा गावाजवळ नवीन बांधकाम करून नाल्यावर पुल बांधला होता. त्या बद्दल काही दिवस अगोदर मजबूत सिमेंट काँक्रीट चा रोड व पुल तयार करण्याची मागणी करण्यात आली होती.

          सरपंच्या सोनाली प्रविण धोटे यांनी मागणी केली होती. त्याच बरोबर गावातील माजी सरपंच पुरुषोत्तम धोटे रंगराव निबुरकर, राजेंद्र धोटे, दिवाकर लक्षणे राजेंद्र महाजन, सुभाष धोटे, श्रावण मोठे, विक्की डोगरे सह सर्व ग्रामस्थ व गरांडा ग्रामपंचायतीने गरांडा गावाला शेतात व इतर हिंगणा व सोनेगाव गावांना जोडणारा रस्ता लवकरात लवकर नव्याने बांधण्याची मागणी केली होती.

           गरडा गावाच्या सरपंच सोनाली प्रविण धोटे, माजी सरपंच पुरुषोत्तम धोटे, रंगराव निबुरकर, राजेंद धोटे, सुभाष धोटे, दिवाकर लक्ष्य, श्रावण मोठे विक्की डोंगरे यांनी निवेदन दिले, परंतु वरील निवेदनाची दखल न घेतल्याने महिनाभरापूर्वी खडीकरण रस्ता व कल्व्हर्ट गरांडा ते हिंगणा व सोनेगाव या रस्त्यावर बांधलेला कल्व्हर्ट पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पूर्णपणे वाहून गेला त्यामुळे दळणवळण ठप्प झाले.