संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत
दि.१९,२० तारखेला सत्तच्या मुसळधार पावसाने झोडपल्यामुळे भेंडी,कोहळा, वांगी,दोळके, इत्यादी भाजीपाला पिकांचे तसेच नुकतेच भात पिकाची रोवणी झालेला पीक पाण्याखाली आल्यामुळे शडुन पाण्याच्या प्रवाहाणे वाहून गेल्यामुळे भात रोवणी दुबार करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
भात पेरणी पेक्षा भात रोवणीला शेतकऱ्याला चारपट खर्च येत असतो चिखलनी खर्च, रोवणी खर्च , खतांचा खर्च, बियाणे खर्च येत असल्यामुळे दुबार रोवणी करण्यासाठी आता शेतकऱ्यावर मोठे संकट आले आहे.
तरी शासन प्रशासनाने मोका पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावे अशी मागणी पंचायत समिती सदस्य अनिल किरणापुरे यांच्यासह शेतकऱ्यांनी व गावकरी लोकांनी केली आहे.