दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चिमूर :-
चिमूर तालुक्यात मागील चार-पाच दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.यामुळे चिमूर तालुक्यातील सर्व नदी-नाले-तळे भरगच्छ भरून वाहू लागली आहेत.
सततच्या जोरदार धार-धार पावसामुळे चिमूर तालुक्यातील सर्व परिसर जलमय झाला असून शेतांमध्ये पावसाचे पाणीचपाणी साचल्याचे दृश्य बघायला मिळाले.
सदर अतिवृष्टीमुळे शेतात असलेल्या पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी राजा अधिक चिंता ग्रस्त झाला आहे,आर्थीक संकटात सापडला आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्वच पिक नुकसानीची बाब लक्षात घेता चिमूर तालुका हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी या आशयाची संवेदनशील मागणी युवा काँग्रेस कार्यकर्ता शुभम वि.गजभिये यांनी केली आहे.
सविस्तर असे आहे की, सतत होत असलेल्या नैसर्गिक आसमानी संकटामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.अतिदृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीमुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.काही दिवसापासून सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे चिमूर तालुक्यातील नादी नाले तलाव भरून वाहत असल्यामुळे चिमूर तालुक्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुराचे पाणी चक्क शेतातून वाहत असल्याने काही शेतात पाणी देखील साचून राहत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.यात सोयाबीन,तूर, कापूस,धान पऱ्हे यासारख्या पिकांची माती सह रोपटे वाहून गेली आहेत.
त्यामुळे चिमूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची नुकसान भरपाई देणे तितकेच गरजेचे आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांची अतिवृष्टीमुळे झालेली हानी त्यांना हवालदिल करणारी ठरली आहे.
यामुळे शेतकऱ्यांना शासन स्तरावरुन त्वरित आर्थिक मदतीची गरज असल्याचे प्रखर मत युवा काँग्रेस कार्यकर्ता शुभम वि.गजभिये यांचे आहे.
शेतकऱ्यांच्या पिक नुकसान भरपाई संबंधांने युवा काँग्रेस कार्यकर्ता शुभम वि.गजभिये हे तहसीलदार चिमूर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री,महशुल मंत्री,कृषीमंत्री,यांना पत्रव्यवहार करणार आहेत.