चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधि भंडारा
लाखनी:-
येथील लाखनी नगरपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर लाखनी नगरपंचायत व ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब यांचे सयुंक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा उपक्रम’ व लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरण व परिसर स्वच्छता विभागातर्फे पर्यावरणस्नेही वटपौर्णिमाचे निमित्ताने वडाचे झाडाचे वृक्षारोपण नगरपंचायत अध्यक्षा त्रिवेणी पोहरकर, सिटी प्लॅनर व कोआर्डिनेटर लीना कळम्बे ,प्रा. अर्चना गायधने यांचे हस्ते करून इकोफ्रेंडली वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.
यावेळी लाखनी नगरपंचायतचे पर्यावरण ब्रँड अँबेसेडर व ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी वटपौर्णिमा निमित्ताने वडाच्या झाडाचे पूजन करण्यासोबत वड वृक्ष लागवड करण्याचे आवाहन सर्व स्त्रियांना केले व वडाच्या झाडाचे महात्म्य समजावून दिले.
नगराध्यक्षा त्रिवेणी पोहरकर , नगरपंचायत सिटी प्लॅनर लीना कळम्बे, प्रा.अर्चना गायधने यांनी सर्व महिलांना वटपौर्णिमेला प्रत्येक स्त्रीने वडाचे झाडाचे पूजनासोबत वटवृक्षाचे वृक्षारोपण दरवर्षी करून परिसर हिरवेगार करावा व खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या सावित्रीबाईसारखे वटपौर्णिमा पुराणकथेमधील निसर्गाची आधुनिक सावित्री बनावे असे आवाहन या निमित्ताने केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नगरपंचायत कर्मचारीवर्ग तसेच कामगार वर्गाने अथक परिश्रम घेतले. वृक्षरोपे ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व अशोका बिल्डकॉमचे पर्यवेक्षक अभियंता नितीश नागरीकर यांचेतर्फे पुरविण्यात आले.
कार्यक्रमाला नेफडो जिल्हा भंडारा,अभा अंनिस तालुका शाखा लाखनी जिल्हा शाखा भंडारा, रा.स्व.संघ भंडारा जिल्हा पर्यावरण विभाग , गुरुकुल आयटीआय,अमर जवान शहीद स्मारक प्रणेते सुभेदार ऋषी वंजारी ,लाखनी नगरपंचायतचे सक्रिय नगरसेवक संदीप भांडारकर, सिद्धिविनायक हॉस्पिटल संचालक डॉ मनोज आगलावे,सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता रजत अतकरे व ऋतुजा वंजारी,नाना वाघाये,श्री हॉस्पिटल संचालक डॉ योगेश गिर्हेपुंजे,ग्रीनफ्रेंड्स पदाधिकारी अशोक वैद्य, अशोक नंदेश्वर,ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे,मंगल खांडेकर,गोपाल बोरकर, रमेश गभने,अशोक हलमारे,गुरुकुल आयटीआय प्राचार्य खुशालचंद्र मेशराम,से.नि. प्रा.राजेंद्र दोनाडकर ,सेवानिवृत्त अभियंता सुधीर जोशी इत्यादींनी सहकार्य केले.