जागतिक सिकलसेल दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात जनजागृती व तपासणी… 

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

नुकतेच “जागतिक सिकलसेल नियंत्रण दिवस” 19 जून ला उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे साजरा करण्यात आला. सोबतच रुग्णांची चाचणी करण्यात आली व सिकलसेल ग्रस्त रुग्णांनाना Hydroxyurea चे पण वितरण करण्यात आले. प्रोजेक्टर वर सिकलसेल बाबत चित्रफिट दाखवून सिकलसेल चे गांभीर्य आणि त्याबाबत जनजागृती करण्यात आली.

       चित्रफितच्या माध्यमातून सिकलसेल ग्रस्त रुग्णांना सिकलसेल प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगण्यात आल्या. त्याच बरोबर रुग्णांणी घ्यावायची काळजी, आहार आणि व्यायाम या बाबत समुपदेशन करण्यात आले.

      या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष स्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमित ठमके ,तर वैद्यकीय अधिकारी कोवे सर, वैद्यकीय अधिकारी (आयुष विभाग ) Dr.जुमनाके मॅडम, वैद्यकीय अधिकारी डॉ. राऊत सर, डॉ. देशमुख सर (RBSK ), डॉ. दुपारे मॅडम (RBSK ), RKSK समुपदेशक श्री. उके सर, TB supervisor बडोले सर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मेघा वलथरे,सिकलसेल पिअर एज्युकेटर रोहित लाडे, NCD विभाग, ICTC विभाग व इतर कर्मचारी उपस्थित होते.