चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधि भंडारा
लाखनी :- तारागोविंद बहुद्देशीय संस्था सेंदूरवाफा व ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीतर्फे मानेगाव बेढा येथील पट शर्यत भरणाऱ्या जागेजवळ अमर जवान शहीद स्मारक येथे आंतरराष्ट्रीय योग दिन लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने साजरा करण्यात आला.
त्याचप्रमाणे ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने लाखनी बसस्थानकावर तयार केलेल्या नेचर पार्कवर सुद्धा मानव सेवा मंडळातर्फे लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय योग दिन विविध योगासने, व्यायाम, नृत्य व्यायाम करून साजरा करण्यात आला.
यावेळी मानेगाव बेढा येथील अमर जवान शहीद स्मारकाचे प्रणेते व तारागोविंद बहुद्देशीय संस्थाचे मुख्य प्रवर्तक सुभेदार ऋषी वंजारी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहीती देऊन अमर जवान शहीद स्मारक येथे निःशुल्करित्या आयोजित केलेल्या उन्हाळी क्रीडाशिबीर उपक्रम ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच स्वावलंबन शिबिराची इत्यंभूत माहिती दिली.
लाखनी नगरपंचायतचे पर्यावरण ब्रँड अँबेसेडर व ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रम घेण्यात येतात याची माहिती दिली.आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विविध ऑनलाइन निःशुल्क योग वर्गाची विस्तृतपणे माहिती दिली तसेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे मागील 5 वर्षांपासून तसेच मानव सेवा मंडळाच्या साहाय्याने मागील दोन वर्षांपासून लाखनी येथील बसस्थानकावर ग्रीनफ्रेंड्सने तयार केलेल्या नेचर पार्कवर आंतरराष्ट्रीय योग दिन लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रमांनी साजरा होत असल्याचे सांगितले.
यावेळी अमर जवान शहीद स्मारक येथे सर्व शिबिरार्थीद्वारे ‘करे योग- रहे निरोग’ तसेच ‘घर घर जायेंगे-सबको योगी बनायेंगे’ ची उद्घोषणा अनेकदा करण्यात आली.यावेळी विविध योगासने व व्यायाम शिबिरार्थीकडून करवुन घेण्यात आली.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नेफडो जिल्हा भंडारा,अभा अंनिस तालुका शाखा लाखनी जिल्हा शाखा भंडारा,गुरूकुल आयटीआय, रा.स्व.संघ भंडारा जिल्हा पर्यावरण विभाग, तारागोविंद संस्थाचे मुख्य प्रवर्तक सुभेदार ऋषी वंजारी,ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने, सेलोटी सरपंच सुरज निखाडे,मानेगाव सरपंच आशा शिंगनजुडे, उपसरपंच मेश्राम, श्याम दिघोरे तसेच शिबीरार्थी साक्षी सेलोकर, समिक्षा रोकडे, नयना पाखमोडे, फाल्गुनी सावरकर, स्वयंम निखाडे, सुजल पाखमोडे, आदित्य मांढरे, श्याम पाखमोडे, जावेद माकडे, पियुष पंचबुद्धे, रितेश रोकडे, समर्थ पाखमोडे, नीरज पाखमोडे, समीर पाखमोडे, नितीन तितिरमारे ,आलोक निखाडे, रुचिक सावरकर, अभिषेक पाखमोडे, सुरज पाखमोडे, हर्षा पाखमोडे, खिलेश पाखमोडे, हेमेश्वरी रोकडे यांनी योगदिनाच्या पार्श्वभूमीवर अमर जवान शहीद स्मारक येथे मागील 30 दिवसापासून दररोज चालणारे लष्करी कवायत उपक्रम, विविध मैदानी सांघिक खेळांचा तसेच शारीरिक नैपुण्य चाचणी उपक्रमाचा सराव तसेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबच्या सहकार्याने चालणारे वृक्षारोपण,स्पर्धा परिक्षा सराव पेपर,स्वावलंबी व्यक्तिमत्त्व विकासपर कार्यक्रमात व योग दिन कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
अशोका बिल्डकॉमचे पर्यवेक्षक अभियंता नितीश नागरिकर,नगरपंचायत नगरसेवक संदीप भांडारकर,लाखनी नगरपंचायतचे अध्यक्षा त्रिवेणी पोहरकर, स्वच्छता व पर्यावरण विभाग व्यवस्थापन प्रमुख लीना कळंबे,सिद्धिविनायक हॉस्पिटल संचालक डॉ मनोज आगलावे,श्री हॉस्पिटल संचालक डॉ. योगेश गिर्हेपुंजे,सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता रजत अतकरे व ऋतुजा वंजारी, नाना वाघाये ,ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे पदाधिकारी अशोक वैद्य, अशोक नंदेश्वर, ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे, मंगल खांडेकर, सेवानिवृत्त महसुल निरीक्षक गोपाल बोरकर,कपडा व्यावसायिक रमेश गभने,से नि प्राचार्य अशोक हलमारे, गुरुकुल आयटीआय प्राचार्य खुशालचंद्र मेशराम,से. नि. प्रा.राजेंद्र दोनाडकर,सेवानिवृत्त अभियंता सुधीर जोशी इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.