शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर यांना “आळंदीभुषण वारकरी” पुरस्कार प्रदान….

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : वारकरी शिक्षण संस्थेची संकल्पना ज्यांनी मांडली व संस्थेच्या उभारणीत व जडणघडणीत मोलाचे योगदान असणारे वै. मारुतीबोवा गुरव आळंदीकर यांच्या ८१ पुण्यस्मरण दिनानिमित्ताने आयोजित अखंड हरीनाम सप्ताहात पहिला “आळंदीभुषण वारकरी” पुरस्कार वारकरी शिक्षण संस्थेचे मा.अध्यक्ष व आध्यापक शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर यांना संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतीचिन्ह, संपुर्ण पोशाख, तुळशीचा हार व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.नारायण महाराज जाधव हे होते यावेळी आमदार दिलीप मोहिते, उद्योजक प्रभाकर मोहोळ, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगांवकर, पालखी सोहळामालक बाळासाहेब आरफाळकर, ज्ञानेश्वर वीर, बाजीरावनाना चंदीले, चैतन्य महाराज कबीरबुवा, अजित वडगांवकर, ज्ञानेश्वर दिघे, रामभाऊ भोसले, किरण येळवंडे, सागर भोसले, राहुल चव्हाण, माऊली महाराज करंजीकर, माजी नगरसेविका रेश्मा भोसले, कोमल शिंदे, सुनील वाघमारे, विलास वाघमारे व आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

        पृथ्वीराज महाराज जाधव यांनी मानपत्राचे वाचन केले, सुत्रसंचलन माऊली महाराज करंजीकर यांनी तर आभार संकेत वाघमारे यांनी केले. वै.मारोती बोवा गुरव आळंदीकर यांच्या पुण्यतिथीदिनी ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांच्या काल्याच्या किर्तन सेवेने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.