भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
दि.21/06/2024 रोजी पोलीस स्टेशन कटेझरी येथे पोलीस अधीक्षक निलोत्पल सा, अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) चिंता सा., अप्पर पोलीस अधीक्षक(अभियान) देशमुख सा.,अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी एम रमेश यांचे संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीचे माध्यमातून भव्य कृषी मेळावा आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.उमेश धुर्वे, प्राथमिक आरोग्य केंद्र मुरूमगाव कार्यक्रमाचे उद्घाटन कु.पल्लविताई कोल्हे ,सरपंच कटेझरी ग्रामपंचायत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कृषी सहाय्यक श्रीमती डी. वी.उसेडी, प्रभारी अधिकारी पीएसआय जनक वाकणकर पो.स्टे. कटेझरी, पीएसआय प्रदीप साखरे, पीएसआय अजय भोसले, पीएसआय विशाल नल्लावर व जिल्हा पोलीस अमलदार तसेच SRPF ग्रुप 12 हिंगोली चे पीएसआय गजर व सर्व अंमलदार तसेच 8 गाव चे गाव पाटील व जवळपास 300 ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.
मेळाव्याची सुरुवात भगवान बिरसा मुंडा व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करुन सुरुवात करण्यात आली. प्रभारी अधिकारी जनक वाकणकर यांनी शासकीय योजना व विविध प्रशिक्षने तसेच मावोवादी विचारसरणी पासून सर्व नागरिकांना दूर राहण्याचे आवाहन केले. पो उप नि प्रदीप साखरे यांनी ग्रामस्थाना जादूटोणा, करणी, भूतप्रेत, काळी जादू या विषयावर जादूटोणा विरोधी कायद्यबद्दल जागृत करण्यात आले.
तसेच कोणीही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून बेकायदेशीर कृत्य केल्यास त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाही करण्यात येइल तसेच झाड फुकवर विश्वास न ठेवता डॉक्टरांकडे उपाचार करावे तसेच पो उप नि अजय भोसले यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले तर पो उप नि विशाल नल्लावर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
कृषी सहाय्यक श्रीमती डी. वी.उसेडी यांनी कृषी विषयक योजनेविषयी मार्गदर्शन केले व आधुनिक शेती, कीड नियंत्रण, फेरोमेन कीड ट्रॅप, आधुनिक पेरणी पद्धत व जैविक खते आणि जैविक कीटकनाशके याविषयी ग्रामस्थाना मार्गदर्शन केले. तसेच डॉ धुर्वे यांनी आरोग्य विषयी मार्गदर्शन करून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त समस्त ग्रामस्थ्यांचे योग व मेडिटेशन घेतले. कटेझरी चे सरपंच कु पल्लवी कोल्हे व गाव पाटील दुर्गसाहाय कोल्हे यांनी ग्रामस्थना जास्तीत जास्त शासकीय योजनाचा लाभ घेण्याकरिता प्रोत्साहित केले.
तसेच उपस्थीत ग्रामस्थाना पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध कृषिविषयक साहित्य वाटप करण्यात आले. यात 50% अनुदानावर 25kg चे 1010 धान बियाणे – 15 बॅग (तसेच 25% अनुदानावर 25kg चे 1010 धान बियाणे नोंदणी – 20) जैविक कीटकनशाके -190 नग लिक्विड जैविक कीटकनशाके- 15फरोमन कीटके ट्रॅप – 100 कृषी कार्यशाळा किट-100 पावसाळी प्लास्टिक घोंगडे -100 शाळेतील मुलांना रजिस्टर्स व पेन प्रत्येकी – 50 नग छत्री – 50 नग प्लास्टिक घमेले-100 नग साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच मेळाव्यात नागरिकांना विविध योजनांचा लाभ देन्यात आला.
यामध्ये नागरिकांचे आधार कार्ड -15 आधार कार्ड डाउनलोड 21करून देण्यात आले कास्ट प्रमाणपत्र 03 अधिवास प्रमाणपत्र-10 आभा कार्ड -25 आयुषमान कार्ड 05 ई श्रम कार्ड – 13 वाहन चालक परवाना -03 तसेच वैद्यकीय तपासणी डॉ. उमेश धुर्वे व टीम यानी 45 ग्रामस्थाना तपासुन मोफत औषध चे वाटप केले.
उपस्थित सर्व नागरिकांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली.पोलीस अंमलदार गोविंद उईके यांनी संचालन व आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. मेळावा शांततेत पार पडण्याकरिता ज़िल्हा पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच SRPF चे अधिकारी व अंमलदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले मेळाव्याला नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.