कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- पारशिवनी पोलीस स्टेशन अर्तगत पूर्वेस १३ किलोमिटर अंतरावर मौजा खंडाळा ( डुमरी) येथील ८५ वर्षीय वृद्ध असलेल्या देवराव मोरकु बरडे यांनी आजाराला कंटाळून विहिरित उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.
पोलिस सुत्रा व्दारे मिळाली माहीती अशा प्रकारे आहे कि मृतक देवराव मोरकु बरडे हा वृद्ध गेल्या 10 महिन्यापासून टि.बी ग्रस्त (क्षयरोग) होते.त्यांचे उपचार खाजगी रुग्णालयात सूरू होते.
मृतक देवराव बरडे याने सदर टिबी (क्षयरोग) चा बिमारीला कंटाळून गावातील श्री प्रवीण कुसुंबे यांचा शेतामधील विहीरीमधे उडी घेवून आत्महत्या केली.
तक्रारदार मृतकाचे पुत्र चन्दशेखर देवराव बरडे वय ४८ वर्ष यांच्या तोंडी रिपोर्ट वरून पारशिवनी पोलिसांनी मर्ग क्रमाक २२/२३ कलम जा.फो.१७४ अन्वये मर्गचा गुन्हा दाखल करून गुन्हाचा पुढील तपास पारशिवनी पुलीस करित आहे .