कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी.
पारशिवनी :-पो.स्टे. पारशिवनी अर्तगत फिर्यादी नामे- शेषराव गुंडेराव काकडे, वय ५२ वर्ष रा. ईंटगाव ता. पारशिवनी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. पारशिवनी येथे अप. २२३/२०२० कलम ३०२,२०९ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
यातील मृतक नामे- सौ. ममता जग्गु धुर्वे, वय ४० वर्ष रा. ईटगाव ता. पारशिवनी व आरोपी नामे जग्गु सनक धुर्वे वय ४५ वर्ष रा ईटगाव ता. पारशिवनी हे पती-पत्नी होते.
यातील आरोपीने मृतक पत्नीला दुसऱ्या व्यक्तीसोबत का बोलते असे म्हणुन तिच्या चारित्र्यावर संशय घेत भांडण केले होते व भांडणातंर्गत आरोपीने मृतकाचे नाक दाबून शिवानीशी ठार केले होते..
सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून सहायक पोलीस निरीक्षक श्री. नितेश गोहणे यांनी सदर प्रकरण न्याय प्रविष्ठा करीता मा.डी.जे.लाडेकर सा. कोर्टमध्ये सादर केले होते.
२० जून रोजी मा.कोर्ट विद्यमान न्यायाधीश श्री लाडेकर सा. यांनी वरील नमुद आरोपीस कलम ३०२ भादवि मध्ये आजिवन कारावास व १०००/- रु. दंड,दंड न भरल्यास ०१ महीना साधी कैद तसेच कलम २०१ भादवि मध्ये ३ वर्ष सश्रम कारावास व १०००/-रु. दंड. दंड न भरल्यास ०१ महीना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने एपीपी गनगने मॅडम यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणुन पोहवा / १३८६ शैलेंद्र रामटेके पो.स्टे.पारशिवनी यांनी मदत केली आहे.