चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
भंडारा(साकोली):- नगर परिषद साकोली तर्फे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ , शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता स्वच्छतादूत ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विविध क्रीडा स्पर्धा आयोजन, जिल्हा, विभाग ,राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवणारे वालीबॉल,टेबल टेनिस, आर्चरी, बुद्धिबळ, फुटबॉल या खेळांचे मार्गदर्शक, महाराष्ट्र शासन पुरस्कृत क्रीडा संघटक /मार्गदर्शक शाहीद कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांच्या कार्याचा गौरव करण्याकरिता नगर परिषद साकोली तर्फे त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके स्वप्निल हमाने ,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश बैस, प्रकाश बाळबुधे उपस्थित होते, त्यांचे अभिनंदन सर्व शिक्षक पालक तालुका पत्रकार संघ व शहरवासीयांनी केले आहे.