वणी : परशुराम पोटे
कर्करोग ही भारतासह जगासमोरची एक प्रमुख समस्या आहे. दरवर्षी लाखो लोकांना कर्करोगानं आपला जीव गमवावा लागतो. बदलती जीवनशैली, भेसळयुक्त आहार,व्यसन आदी कारणांमुळे कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येतं. भारतात दरवर्षी सुमारे १.१ दशलक्ष नविन प्रकरणे नोंदवली जात आहेत. कर्करोगाच्या दोन- तृतीयांश प्रकरणांचे निदान शेवटच्या टप्प्यावर होते, ज्यामुळे रुग्णांची जगण्याची शक्यता कमी होते. योग्य वेळी निदान झाल्यास प्राथमिक अवस्थेतील कर्करोगाचा उपचार होऊ शकतो.नंतरचे उपचार आर्थिक आणि तुलनेनं कमी प्रभावी ठरतात. त्यामुळे सुरुवातीच्या स्तरांवर उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचु शकतो.
कर्करोगांच निदान व कर्करोगास कारणीभूत जीवनशैली टाळण्यासाठी जागरूकता निर्माण करणे ह्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांचे संयूक्त विद्यमाने कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियाना अंतर्गत वणी येथे मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत ज्यामध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, तोंडाचा कर्करोग आणि ब्राँकायटिस कर्करोग च्या तपासण्या होणार आहे. तरी सदर शिबिर दि. 24 जून रोजी सकाळी 10 ते 5 वाजे पर्यंत श्री विनायक मंगल कार्यालय छोरीया टाऊनशिप वणी येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक विजयबाबू चोरडिया यांनी केले आहे.