पंकज चहांदे

दखल न्यूज भारत

देसाईगंज – नुकतेच नगर पालिकेचे प्रभाग निहाय आरक्षण जाहिर झाले असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीची रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. अशात आम आदमी पक्षाने सुद्धा देसाईगंज नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा दि. २१ जुन २०२२ ला आयोजित पत्रकार परिषदेत केली.

     आम आदमी पक्ष आगामी न. प. देसाईगंज निवडणूक रिंगणात उतरणार असून सर्वच प्रभागात २१ ही उमेदवार उभे करण्याचा निर्धार आहे. नागरिकांनी विविध पक्षाचे, संघटनेचे कारभार अनुभवले परंतु आम आदमी पक्ष प्रथमच देसाईगंज शहरात परिवर्तन, पारदर्शकता या लढ्यात सामील होवून आपण बदललो तर जनता बदलेल “तुमचा विकास तुमच्या हातात”, आपण क्रांतीच्या लढ्यात सामील होणे काळाची गरज असून प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या पसंतीच्या इसमाला उमेदवारी देण्यात येईल. असेही पत्रकारपरिषदेत माहिती दिली.

    आम आदमी पक्षाच्या वतीने दररोज प्रभाग निहाय चाचपणी सुरू असून लवकरच नागरिकांच्या पसंतीच्या उमेदवाराला उमेदवारी जाहिर करण्यात येणार असून पक्षाच्या वतीने शिक्षण, आरोग्य व पिण्याच्या पाण्याच्या समस्येला प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

      पत्रपरिषदेला आम आदमी पक्षाचे देसाईगंज शहर संयोजक आशिष घुटके, शहर सचिव तरबेज खॉ पठाण, युवा संयोजक सुरेश बुल्ले, शहर सह संयोजक नवेद शेख, सदस्य कैलास दिघोरे आदी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News