अकोट प्रतिनिधी
आकोट तालुक्यातील डांगरखेड येथे काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली होती.
भावासाठी बहिणीने मारली होती धरणात उडी, पण चिमुकल्यांवर काळाने घातला घाला डांगरखेड या आदीवासी बहुल गावातील सख्ख्या बहिण-भावाचा चिचपानी धरणात बुडून मृत्यू झाला होता. गेलेल्या दोघा चिमुकल्यांवर काळाने घाला युवराज केशव बेलसरे (९) आणि प्रतीक्षा केशव बेलसरे (११) अशी मृतांची नावं आहेत. दोन्ही मुलांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने त्यांचे वडील केशव बेलसरे यांच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
केशव बेलसरे याची अत्यंत बिकट परिस्थिती असून त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा युवराज आणि अकरा वर्षीय मुलगी प्रतीक्षा हे दोघे शेजारच्या मुलीसोबत धरणावर गेले होते. त्यावेळी युवराज धरणाच्या पाण्यात गेला. त्याचदरम्यान त्याची बहिण प्रतीक्षा आणि तिची मैत्रिण पाण्याबाहेर होती. युवराज धरणात गेला असताना पाण्यात बुडत असल्याचे प्रतीक्षाने पाहिलं.
त्यानंतर प्रतीक्षाने युवराज ला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, दोघांनाही पाण्याचा प्रवाहाचा अंदाज येत नसल्याने बाहेर पडता येत नव्हते. ही सर्व घटना तिच्या मैत्रिणीने पाहिल्यावर तिने गावात धाव घेतली. पण ग्रामस्थांची मदत मिळेपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे या चिमुकल्या बहिण-भावाचा दुर्देवी मृत्यू झाला. होता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन सांत्वन भेट दिली, असता प्रमोद देंडवे जिल्हाध्यक्ष संजय कासदे उपसभापती पं. स.अको दिवाकर गवई, दिपक बोडखे, शैलेश धांडे व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी भेट दिली.