म.ग्रा.रो.ह.योजनेअंतर्गत रखडलेला पांदण रोड खडीकरण पूर्ण होण्यासाठी माजी सरपंच धनराज डवले यांचेकडून गटविकास अधिकारी यांना निवेदन…

     रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि

           गेल्या 10 वर्षां पूर्वी ग्रामपंचायत गदगाव अंतर्गत गदगाव गावातील लगतच असलेला रामदास मेश्राम यांचे घरापासून ते दुवादासजी गेडाम यांचे शेतापर्यंत गावातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्ण करण्यात आला होता.

           मात्र त्यानंतर झालेल्या माती कामावर मुरूम टाकून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली होती. तेव्हापासून त्या रस्त्यावर शासनाने ठरविलेल्या कार्यप्रणालीनुसार खडीकरण करणे महत्वाचे होते.

         मात्र तसं न होता रस्त्याचे खडीकरण मंजुरी असून सुद्धा कामाला थंडबसत्यात ठेऊन मंजूर रस्त्याला प्रलंबित ठेवून गावातील शतकऱ्यांना त्रास देण्याचे कुटील काम प्रशासनाकडून केल्या जात आहे.

          सदर रस्त्याने गावातील ७०% शेतजमिनी असून प्रलंबित असलेला पांदण रस्ता हा गावासाठी महत्वाचा पांदण समजला जातो. पांदण रस्ता मजबूत न झाल्याने रस्त्यात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून शेतकऱ्यांना बैलगाडी नेण्यासाठी, शेतीला पेरणीसाठी आवश्यक धान्य व शेणखत तथा रासायनिक खते डोक्यावर वाहून न्यावं लागतात.

            डोक्यावर वजनी साहित्य वाहून नेतांना बरेचदा शेतकऱ्यांचा अपघात सुद्धा झालेला आहे. पावसाच्या दिवसांमध्ये सदर रस्त्याने शेतकऱ्यांना चालणे व जनावरांना रिकाम चालणे सुद्धा शक्य होत नाही.

          गावातील गुराढोरांना जाण्यासाठी, शेतात जाण्यासाठी अतिशय महत्वाचा हा पांदण रस्ता असून एक महिन्यावर येऊन ठेपलेला पावसाळा ऋतू बघता सदर रस्त्याचे प्रलंबित काम पावसाचे दिवस सुरू होण्याआधी लवकरात – लवकर खडीकरण पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

            अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर गावातील शेतकऱ्यांचे समवेत आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन माजी सरपंच धनराज डवले यांचे कडून गावकऱ्यांचे समवेत गटविकास अधिकारी पंचायत समिती चिमूर यांना देण्यात आले.