विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल… — विश्वशांती ची काजल प्रधाने तालुक्यातून प्रथम…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधि 

     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर बोर्ड द्वारे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक विभाग (वर्ग १२ ) चा निकाल नुकताच जाहीर झाला,त्यात भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथील वर्ग १२ वी च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे विज्ञान शाखेतून कु.काजल प्रधाने हिने ५१७ (८६.१७) टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

           उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये कला विभागाचा एकूण निकाल ९७.८९ टक्के,विज्ञान विभाग १०० टक्के,वाणिज्य विभाग १०० टक्के आणि एचएससीवीसि विभाग १०० टक्के लागला आहे.

          कला शाखा

प्रथम क्रमांक: कू.श्वेता दुशांत मंगर ४९९ (८३.१७टक्के)

द्वितीय क्रमांक :सलोनी गुणाजी मंगर४८६ (८१:००टक्के)

तृतीय क्रमांक: कु.सलोनी राजेंद्र कावळे ४७८(७९.६७टक्के)

विज्ञान शाखा

प्रथम क्रमांक:कु. काजल परशुराम प्रधाने ५१७(८६.७०टक्के)

द्वितीय क्रमांक: कु.रिया प्रफुल गड्डमवार ४७९ (७९.८३टक्के)

तृतीय क्रमांक: कु.स्वाती लोकाजी ठाकरे ४७५(७९.१७टक्के)

वाणिज्य शाखा

प्रथम क्रमांक: कल्पक बापूजी पोवरे ४९५ (८२.५०टक्के)

द्वितीय क्रमांक: केतन पत्रुजी नवघडे ४६५(७७.५०टक्के)

तृतीय क्रमांक: कु.रेणुका ईश्वर मडावी ४५३(७५.५०टक्के)

एचएससीव्हीसी शाखा

प्रथम क्रमांक : धर्मदेव रवींद्र वेट्टे३८४(६४.००टक्के)(इलेक्ट्रिकल विभाग)

प्रथम क्रमांक: कु.समीक्षा राजू कुंभरे ४१०(६८.३३टक्के) हॉर्टिकल्चर विभाग)

प्रथम क्रमांक: कु.पूजा दिलीप कांबळे ४१०(६८.३३टक्के) (क्रॉप सायन्स) यांनी पटकावीला आहे.

           गुणवंत विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे पदाधिकारी तथा सदस्य,मुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.