नंदलाल पाटील कापगते विद्यालयाची यशाची परंपरा कायम…

ऋग्वेद येवले

 उपसंपादक

दखल न्युज भारत

            साकोली – नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथील फेब्रुवारी/ मार्च – 2024 च्या एच.एस.सी. परीक्षेचा निकाल दरवर्षीप्रमाणे 100 टक्के लागला. 

            नंदलाल पाटील कापगते विद्यालयातील विज्ञान शाखेतून एकूण 241 विद्यार्थी प्रविष्ट झाले सर्वच 241 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी प्रावीण्य श्रेणीत 18 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 98 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उज्वल यशाची परंपरा कायम राखत विद्यालयातून प्रथम क्रमांक कु. हिमांशी आंबुले (89.67℅), द्वितीय क्रमांक कुमारी नेहा मस्के(83℅) , तृतीय सोहम कापगते (82.33℅) , तसेच आदित्य कापगते (82%), कु. भाग्यश्री कापगते (81.33%) उज्वल कापगते (81.67%) कु. अंकिता कापगते (79.17%), कुमारी मेघा कापगते (79.17%), कु. चारुशीला आगाशे (78.83%) रोहित राखडे (78.17%), कु.रौनक मल्लांनी (77.83%) गौरव देशमुख (77.50%) कु.दृष्टी खोटेले (77.17%), कु. केमु गहाणे (76.83%) . 

         तसेच विद्यालया मधील व्दिलक्षी अभ्यासक्रम एम.सी.व्ही.सी. विभागाचा निकाल 90.40 टक्के लागलेला असून त्यामध्ये साक्षी पंधरे 75.17%, पुष्पा टेकाम 66.83%, जागृती नेवारे 60.83%.

          नंदलाल पाटील विद्यालयातील विद्यार्थी हे कला क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रामध्ये तालुक्यात नेहमी अग्रेसर असतात हीच उज्वल देशाची परंपरा कायम राखत मानाचा तुरा यांच्यावर ठेवला त्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य रसिका कापगते, प्राध्यापिका स्वाती गहाणे , प्रा. सुनील कापगते, प्रा. कैलास लोथे, प्रा. नागोसे, एम. एम. कापगते, डी.डी.तुमसरे, डी एस बोरकर व इतर प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.