आरमोरीत २२ व २३ में ला बौध्द पौर्णिमेनिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमाची आयोजन….

प्रितम जनबंधु

     संपादक 

        आरमोरी :- तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जीवनाचा मंगलमय व वैशिष्ट्यपूर्ण घटनाक्रमाचा दिन म्हणजे बुद्ध पौर्णिमा या दिनाचे औचित्य साधून जेतवन बौद्ध समाज विकास मंडळाच्या वतीने २२ आणि २३ मेला विविध कार्यक्रमाचे आयोजन जेतवन बौद्ध विहारात करण्यात आलेला आहे.

             दिनांक २२ मे रोजी सकाळी ११ वाजता विवीध स्पर्धा होणार आहेत सायंकाळी ७.३० वाजता कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.    

               कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रेरणा शिक्षण संस्थेचे सचिव मदन मेश्राम हे राहणार आहेत कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. नामदेवराव किरसान यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाचे सह उद्घाटक म्हणुन शिक्षण महर्षी भाग्यवान खोब्रागडे हे राहणार आहे.

            प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार ललितकुमार लाडे, ठाणेदार विनोद रहांगडाले मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, मनोज वनमाळी चंद्रकांत बारसाकडे, लक्ष्मी मने, अमोल मारकवार, मनीषा दोनाडकर, अशोक वाकडे, सामाजिक कार्यकर्ते जयकुमार मेश्राम, योगेंद्र बनसोड प्रा शशिकांत गेडाम, मोरेश्वर टेंभुर्णे, धर्मा बांबोळे यशवंत जांभुळकर पुणेकर, प्रा. जय फुलझेले, प्रा. रविंद्र बांबोळे प्रा. सुरेश चौधरी,कुमार शेंडे, प्रा साईनाथ अदलवार प्रा.प्रकाश पंधरे आदी उपस्थित राहणार आहेत.

              रात्रौ ८.३० वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दिनांक २३ मे ला सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहण, सायंकाळी ७ वाजता सामूहिक बुद्ध वंदना व खिरदान, रात्री ७.३० वाजता गोंदिया येथील मिस नंदनी यांचा “प्रथम नमो गौतमा” हा समाज प्रबोधन पर बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम होणार आहे.              

             कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जेतवन बौद्ध समाज विकास मंडळचे अध्यक्ष प्रशांत खोब्रागडे, उपाध्यक्ष खुशाल गोवर्धन, सचिव प्रकाश खोब्रागडे, सहसचिव सिद्धार्थ बांबोळे, कोषाध्यक्ष विजय वाकडे व जेतवन बौद्ध समाज विकास मंडळ, नवयुवक मंडळ व महिला मंडळ यांनी केले आहे.