माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी कॅन्सर ग्रस्ताला केली आर्थिक मदत..

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

       अहेरी तालुक्यातील शिवणीपाठ येथील रहिवासी सुरेश वेलादी यांना कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे आणि त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्यांनी उपचार घेण्यासाठी अळचण होत होती.

        सुरेश वेलादी यांच्या प्रकृतीची माहिती शिवणीपाठ येथील कार्यकर्तेकडून आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळतच त्यांनी कॅन्सर ग्रस्त सुरेश वेलादी यांच्या कुटूंबातील सदस्यांना काल अहेरी येथील जनसंपर्क कार्यालय येथील बोलवून पुढील औषधोपचाराकरिता आर्थिक मदत केली.

          यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,सुमित्रा सुरेश वेलादी,राजपूर पॅंच ग्रामपंचायत मीना वेलादी, मधुकर वेलादी राजपूर पॅंच ग्रामपंचायत सदस्य,सुंदराबाई वेलादी सदस्य राजपूर पॅंच ग्रामपंचायत,सुरज गंगाधारीवार सदस्य राजपूर पॅंच ग्रामपंचायत, दशरथ तलांडे, प्रशांत वेलादी,राकेश सडमेक, विनोद रामटेके,रवी भोयर, नरेश गर्गम सह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.