बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
शिराळा तालुका परांडा येथे शंभू महादेव यात्रा उत्सवा निमित्त निकाली कुस्त्याचे जेंगी मैदान भरविण्यात आले. शिराळा गावातील पंच कमिटी व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे श्रीफळ फोडून पूजन करण्यात आले. नंतर कुस्त्यांना प्रारंभ झाला.
तर एक हजाराहून अधिक कुस्ती मल्ल पैलवान उपस्थित होते. दुपारी 3 ते रात्री 10 वाजे पर्यंत निकाली कुस्त्या घेण्यात आल्या. इनाम रुपये (100000)एक लाख प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पैलवान सुरज मुलाणीला चितपट करून पैलवान हनुमंत पुरीने विजय मिळाला.
इनाम रुपये (75000) हजार द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पैलवान लोकत पवारला चितपट करून शिराळा गावचा पैलवान सुनील नवले यांनी विजय मिळवला. इनाम रुपये (51000) हजार तृतीय क्रमांकाचे पैलवान प्रशांत जगतापला चितपट करून मनोज माने यांनी विजय मिळाला.
शिराळाच्या कुस्ती आखाड्यामध्ये नामांकित प्रसिद्ध असलेल्या महत्वाच्या 7 कुस्त्या लावण्यात नंतर इतर राहिलेल्याही कुस्त्या पुकरून लावण्यात आल्या.
राज्य व राज्याबाहेरून आनेक कुस्ती मल्ल पैलवान व प्रेक्षक यांची 5 हजाराहून अधिक संख्येने उपस्थिती होती. 100 रुपये पासून ते 100000(एक लाख ) रुपये इनामा पर्यंतच्या निकाली कुस्त्या लावण्यात आल्या आहेत.
कुस्ती आखाड्यासाठी प्रमुख शिराळा गावचे ग्रामस्थ आणि मान्यवर व वस्ताद म्हणून काम पाहिलेले विद्यमान सरपंच रेवनदादा ढोरे, सरपंच बालाजी बोंबलट, शंभू महादेव यात्रा कमिटी प्रमुख अध्यक्ष भारत आबा ढोरे, उपसरपंच शिवाजी ढोरे, प्रताप ढोरे, कुमार वाघमोडे, सदानंद बोंबलट, गहीणीनाथ सुरवसे, परशुराम ढोरे, महादेव नवले, प्रशांत उबाळे, सिताराम दबडे, प्रकाश पाटील, युवराज ढोरे, माऊली नवले, हनुमंत ढोरे, नितीन नवले, राजेश गायकवाड, योगेश नवले, बप्पा बोरकर, जनार्दन वाघमोडे, विलास सुतार, तुकाराम सुतार, लक्ष्मण ऊकिरडे, या प्रमुख मान्यवर व शिराळा येथील सर्व ग्रामस्थ यांच्या हस्ते कुस्त्याचे आयोजन करण्यात आले.
संयोजक शंभू महादेव यात्रा कमिटी, ग्रामपंचायत शिराळा, विद्यमान सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, आजी माजी चेअरमन आणि सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या प्रयत्नाने शिराळा येथील शिवशंभु महादेव यात्रा उत्सवा निमित्त निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य व राज्या बाहेरूनही कुस्ती मल्ल आलेले पैलवान व पत्रकार बांधव, मान्यवर, त्यांना देखील मानाचा फेटा बांधून सन्मानित करण्यात आले. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, उस्मानाबाद, नगर,आशा आनेक जिल्ह्यातू नामांकित कुस्तीमल्ल पैलवानांची हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
निकाली कुस्ती मैदानाच्या निवेदना साठी, संपूर्ण राज्यामध्ये ओळख निर्माण झालेले पैलवान दिनेश गवळी बारशी यांची या कुस्ती आखाड्यासाठी प्रमुख निवेदक म्हणून उपस्थित होते.