
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकातंर्गत मौजा मासळ बु येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने बँक प्रतिनिधी निवड करण्या संबंधी सभा पार पडली यामध्ये सत्ताधारी गटाला सुरुंग लावून ईश्वर चिठ्ठी ने निवड करण्यात आली.
येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मासळ बु कडून आज सभागृहात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रतिनिधी निवड करण्याची सभा पार पडली.
यामध्ये तेरा सभासद असतात मात्र एका सभासदाचा अकाली मृत्यु झाला. सत्ताधारी गटाचे आठ सभासद होते तर विरोधी गटाकडे चार सभासद होते.मात्र सहकार क्षेत्रातील डॉ. देवानंद गंधारे व आसिफ शेख यांच्या चाणक्य नितीने ऐन निवड सभेच्या काही वेळातची गणीत बदल करून सत्ताधारी गटात व विरोधात संख्याबळ समान झाले.
यामध्ये वामन बांगडे यांच्या साठी सहा मतदान तर अरुण कारमेंगे यांच्या बाजून सहा मतदान झाले. त्यानंतर ईश्वर चिठ्ठीने अरुण लटारू कारमेंगे यांची निवड झाली.या निवडीमध्ये महत्वपूर्ण भूमिका पॅनल प्रमुख डॉ.देवनाथ गंधारे आसिफ शेख यांनी पार पाडली.
निवडी बद्दल नितेश गणवीर, सुधाकर नन्नावरे, दिलीप गंधारे,दिलीप सुर, विलास श्रीरामे यांनी अभिनंदन केले.