ग्रामदैवत पिरसाहेब व ग्रामस्त यांचा भरणे कुटुंबांच्या पाठीशी आशीर्वाद असल्यामुळे मामा मंत्री झाले,म्हणूनच पिंपरी गावचा विसर पडू देणार नाही :- श्रीराज भरणे यांचे यात्रेनिमित्त उद्गार… — ग्रामदैवत पिरसाहेब यांच्या यात्रेनिमित्त (ऊरूस) नतमस्तक होऊन श्रीराज भरणे यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

       महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व सांस्कृतिक मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव व इंदापूर तालुक्याचे युवक नेते श्रीराज भरणे यांनी पिरसाहेब यात्रेनिमित्त (उरूस) मंदिरामध्ये आपली हजेरी लाऊन पिरसाहेब यांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

        पिंपरी बुद्रुक गावचे ग्रामदैवत पिरसाहेब यांच्या मंदिरात यात्रेनिमित्त श्रीराज भरणे बोलत असताना म्हणाले की,भरणे कुटुंबाचे प्रेम मामांच्या माध्यमातून पिंपरी बुद्रुक गावाला लाभलेले आहे. गावच्या सर्वांगीण विकास कामाला मामा साहेबांच्या प्रयत्नाने जास्तीत जास्त निधी मंजूर करून विकास कामे केलेली आहेत.

         पिंपरी बुदुक गावच्या माय माऊली जनतेने मामाला मतदान रुपी आशीर्वाद दिल्यामुळे विधानसभेला मामाला चांगलेच मतदान देऊन विधिमंडळात पाठवलेले आहे. याबद्दल आमचे भरणे परिवार कधीच विसर पडू देणार नाही. इथून पुढेही चांगलाच विकास जोमाने केला जाईल.पिरसाहेब यात्रेनिमित्त श्रीराज भरणे यांचे यात्रेनिमित्त उद्गार..

        यात्रा कमिटीच्या वतीने श्रीराज भरणे यांचा शाल श्रीफळ हार देऊन सन्मानित करण्यात आले.

        यावेळी इंदापूर तालुक्याचे युवक नेते श्रीराज भरणे, अजितदादा पवार गटाचे जिल्हा ऊपध्यक्ष सुरेश शिंदे, युवक महिला तालुका अध्यक्षा संगीता देशपांडे, साखर कारखाना संचालक श्रीकांत बोडके, माजी सरपंच ज्योती बोडके ,उपसरपंच संतोष सुतार, सोमनाथ बोडके, बाळासाहेब घाडगे,शहाजीअण्णा बोडके, सतीश बोडके,भागवत शेंडगे, नबीलाल शेख, खुदबुद्दीन शेख, ताजुद्दीन शेख, सुनील गायकवाड,मुबारक शेख,आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.