
युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथील नविन विमानतळ पूर्णता तयार झाले असून अवघ्या काही दिवसात प्रवाशांकरिता सुरू होणार आहे. या विमानतळावरून नागरिक मोठमोठ्या शहरांमध्ये प्रवास करतील सोबतच व्यावसायिक कामांचा वेग वाढणार सोबतच स्थानिक दुकानदारांना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध होणार या सर्व मुळे नागरिकांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे.
परंतु त्या ठिकाणी अद्यापही विमानतळाचे नामकरण होऊन कोणतेही नाव देण्यात आले नाही अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून अनेकांच्या मनामध्ये सुद्धा हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत आणि अमरावती जिल्ह्यातील जनतेला सुद्धा असे वाटते की बेलोरा विमानतळाचे नामकरण होऊन हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे असावे.
अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी अमरावती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, युवासेना जिल्हा चिटणीस प्रतिक राऊत, युवासेना दर्यापूर तालुकाप्रमुख सागर गिरहे, युवासेना अंजनगाव तालुकाप्रमुख विशू सावरकर, युवासेना अंजनगाव शहर प्रमुख अक्षय गवळी, युवासेना दर्यापूर शहर चिटणीस रुपेश मोरे, गोपाल महानकर उपस्थित होते.