डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गांडूळ खत युनिट ला जिल्हाधिकारी यांची भेट..

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी

 दिनांक 21 मार्च 2025 ला चेकपिरंजी ता.सावली येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक मिशन योजने अंतर्गत श्री अनिल स्वामी यांच्या शेतात तयार करण्यात आलेली गांडूळ खत युनिट ला विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी भेट देत गांडूळ खत युनिट , व्हमीवाश , बी डी कल्चर, सीपीपी कल्चर ची पाहणी केले.

           सदर भेटी दरम्यान प्रीती हिरळकर प्रकल्प संचालक आत्मा चंद्रपूर,श्री चरडे उपविभागीय अधिकारी मूल, कु. चिरडे तहसीलदार सावली, श्री योगेश गाळे गट विकास अधिकारी सावली,श्री ललित राऊत तालुका कृषी अधिकारी, श्री कावळे बीटीएम, श्री हातझाडे एटीएम सावली हे प्रामुख्याने उपस्थित होते.

         सदर भेटी मध्ये जास्तीत जास्त शेतकरी यांनी नैसर्गिक शेती करीत जमिनीचे संवर्धन करावे असे मत जिल्हाधिकारी महोदय यांनी मांडले.

         सदर भेटी मध्ये काही निवडक व होतकरू शेतकरी याना गांडूळ खताचे बॅग,जैविक निविष्ठा व स्प्रे पंप वाटप करण्यात आले.

          सविस्तर वृत्त असे की कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन 2024 25 अंतर्गत सावली तालुक्यात डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतीमिशन योजना राबविले जात असून त्यात 636 लाभार्थी 500 हे क्षेत्रावर नैसर्गिक शेती करीत असून त्यात सदर योजने अंतर्गत शेतकरी याना वेळोवेळी नैसर्गिक शेती बाबत निविष्ठा निर्मिती बाबत प्रशिक्षण देण्यात आले.

         तसेच सदर योजने अंतर्गत साईश्रेया शेतकरी उत्पादक कंपनी तयार करण्यात आले असून सदर शेतकरी उत्पादक कंम्पनीत योजनेतील शेतकरी भागधारक असून कम्पनी अध्यक्ष श्रीअनिल स्वामी हे एक प्रगतशील शेतकरी यांनी आपल्या शेतात 30 बेडचे गांडूळ खत युनिट उभारणी केले असून त्यांनी सदर योजने अंतर्गत बी डी कल्चर, सीपीपी कल्चर तयार केले आहे. श्री स्वामी यांनी सदर वर्षाला गांडूळ खत मधून जवळपास 10 लाख रुपयांचे उत्पन्न केले.

            तसेच त्यांनी रेड राईस, व्हर्मीवाश हे सुद्धा बाजारात उपलब्ध करून दिले आहे.पुढील काही वर्षात चेकपिरंजी गाव नैसर्गिक शेतीमय व्हावे असे त्यांचे प्रयत्न सूर असून त्याकरिता ते नेहमी जास्तीत शेतकरी याना नैसर्गिक शेती बाबत मार्गदर्शन करीत असतात.