डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना हुकुमशाही आणि हिंसा मान्य नव्हती.‌.. — म्हणूनच देशातील नागरिकांनी समतेची आणि हक्काची लढाई समजून घेतली पाहिजे…

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे विषमतावादी विचाराच्या लोकांनी निर्माण केलेली विषमतावादी आर्थिक सामाजिक सांस्कृतिक व्यवस्थेतील चार वर्णीय व्यवस्थेतील शुद्रतील अतिशूद्र होते.

        म्हणून त्यांना दारिद्र्य बरोबरच शीवाशिव चे चटके बसले.ही अनुभूती त्यांना होती,म्हणूनच त्यांना मार्क्सचा साम्यवाद म्हणजे आर्थिक समता मान्य होती,परंतु त्यांना हुकुमशाही आणि हिंसा मान्य नव्हती,ते वैचारिक स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विचाराचे होते.

      तसेच स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय ही चार मानवी मूल्य आहेत,म्हणून ही मूल्य माणूस असलेल्या प्रत्येक मानवी प्राण्याने जोपासली पाहिजेत,असा त्यांचा आग्रह होता.

      म्हणूनच संविधान बांधणी करताना ही चार मानवी मूल्य संविधानाचा पाया म्हणूनच स्वीकारले.याच चार मूल्यावर सारे संविधान उभे केले.म्हणूनच लोकशाही ही जशी कायदेमंडळ,कार्यकारी मंडळ,न्याय मंडळ आणि प्रसार माध्यमे म्हणजे मीडिया या मुख्य चार खंब्यावर उभी आहे.

       तसेच संपूर्ण संविधान हे स्वातंत्र्य,समता,बंधुभाव,न्याय या चार पिल्लरवर उभे आहे.तसेच या भारतीय संविधानास समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही व्यवस्था निर्माण करावयाची आहे.

      म्हणून हे संविधान समतेचे संविधान आहे,विषमतेच्या विरोधी लढाई करण्याचे एक शास्त्र आणि अस्त्र आहे.

         हे सांविधान जरी समतावादी विचाराचे असले,तरी यात विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क असल्यामुळे या हक्काचा विषमतावादी लोक गैरफायदा घेत आहेत.

      कारण आस्था आणि श्रध्दा याचे स्वातंत्र्य असल्यामुळे धार्मिक जातीय रूढी परंपरा अंधश्रध्दा ज्या विषमतेला खतपाणी घालतात,विषमतावादी संस्कार जोपासतात,विषमतावादी संस्कृती आणि सामाजिक आर्थिक व्यवस्था जोपासण्याचे काम करतात अशा प्रवृत्तींना पण संधी मिळते.

       या प्रवृत्तीची माणसे संविधानातील विचार आचरण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन सत्तेत येतात आणि सत्तेचा ( सैन्य पोलिस प्रशासन ) यांचा वापर करून विषमतावादी व्यवस्था अधिकच मजबूत करण्याचा प्रयत्न करतात,कधी उघड तर कधी अघोषित आणीबाणी लागू करतात.

      परिवर्तनवादी,क्रांतिकारी विचारांच्या लोकांसाठी काही कडक कायदे करून त्यांना अटक करतात,जेलमध्ये ठेवतात.गुंडांना मोकाट सोडतात, आंदोलकांचा समाचार घेण्यासाठी असे काही विपरीतच घडते.

      म्हणून कार्लमार्क्स समतेची व्यवस्था म्हणजे साम्यवाद स्थापन करणेसाठी या विषमतावादी स्वार्थी शोषक प्रवृत्तीच्या लोकांसाठी हिंसेचे शस्त्र आणि हुकुमशाहीचे अस्त्र वापरले पाहिजे ” असे म्हणतो.

       परंतु आपल्या भारत देशात जातीव्यवस्थाने हे मार्क्स चे शस्त्र अस्त्र पण बोथट केले आहे,याचा पण विचार समतेची लढाई करताना करावाच लागतो.

       शिवाय प्रतिगामी असो की पुरोगामी,शोषक असो की शोषित,गरीब असो की श्रीमंत,ब्राम्हण असो की शूद्र,स्त्री असो की पुरुष,विषमतावादी असो की समतावादी,शेतकरी असो की जमीनदार,कामगार असो की भांडवलदार,मालक असो की नोकर,गुरू असो की शिष्य सर्वांसाठी एकच कायदा आणि सर्वानाच विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे.

      कोणतेही आणि कोणत्याही विचाराचे पक्ष असो,सर्वानाच सारखा कायदा,आणि मताचा अधिकार,आणि निवडून सत्तेत जाण्याचा अधिकार या संविधानाने दिला आहे.

      म्हणून हजारो-लाखो वर्षापासून हुकुमशाहीचे जोखडातून सुटून,गुलामगिरीची बंधने तोडून,स्वातंत्र्य लढा जनतेनी दिला.मतदानाचा हक्क मिळविला,सत्तेत जाण्याचा अधिकार प्राप्त करून घेतला,तरी या लोकशाहीच्या स्वतंत्र देशात शोषित,लोभी,अतिस्वार्थी जे आधीच जमीनदार,भांडवलदार, गर्भश्रीमंत आहेत,जे सम्राटांचे , राजेरजवाडे यांचे मांडलिक,हुकुमाचे ताबेदार नोकर होते,तेच 77 वर्षानंतरही सत्तेत आहेत.

     आजही या 21 वें शतकात बहुजन आणि अभिजनांची लढाई चालूच आहे,शोषक शोषित,गरीब श्रीमंत,अन्याय करणारे आणि अन्यायाचे बळी असणारे,यांचे विषमतेविरध्द समतेची लढाई चालूच आहे.

       हुकूमशाही विरूध्द लोकशाहीची लढाई चालूच आहे.संविधान मुळे या शतकात ही लढाई समांतर अशी चालू आहे,स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे हे भारतीय संविधानाच्या आधी ही लढाई एकेरी होती,आता ती दुहेरी झाली आहे.

        शोषित,स्वार्थी,मालक यास कुणीच विरोधक नव्हता,म्हणून एकतर्फी लुबाडणे,फाडून खाणे,अन्याय अत्याचार करणे चालूच होते,कारण संविधान फक्त त्यांचेच आणि त्यांच्याच बाजूचे होते,आता ते दोघांच्याही बाजूचे आहे,म्हणून शोषित आणि शोषक ,सत्ताधारी आणि विरोधक ,मतदार यांचेत ही लढाई लागलेली आहे.

      ही लढाई विषमता विरूध्द समतेची आहे.अभिजन विरुद्ध बहुजनांची आहे,दबलेल्या,पिचलेल्या,वंचित,मागास घटकांची यांना मागे सोडून पुढे गेलेल्या विरूध्द ची आहे.यांना सोडून पुढे जाताच येणार नाही,हे संविधानाने सिध्द केले आहे.

       कारण,”शिका-संघटित व्हा, संघर्ष करा,हा मूलमंत्र संविधानानेच दिला आहे.

        तरीपण शोषक वर्ग सत्तेचा गैरफायदा घेत आला आहे,अनेक क्लृप्त्या,खोडीपणा,षडयंत्र करून मते घेत आहे.गरीब,लाचार,अडाणी, अज्ञानी जनतेचा गैरफायदा घेऊन मतदान मिळवुन सत्तेत जात आहेत.

      दुःख,दारिद्र्य,अज्ञानाचा गैरफायदा घेऊन हे विषमतावादी लढाई जिंकत आहेत,धर्म त्यांची आस्था श्रध्दा,जाती अभिमान या गोष्टीचा पण हे उमेदवार,राजकारणी गैरफायदा घेत आहेत.म्हणूनच बहुजन समाज समतेची लढाई हरताना दिसताहेत.

        लेखक :- दत्ता तुमवाड

          सत्यशोधक समाज नांदेड..

                दिनांक: 22 मार्च 2025….

                  फोन: 9420912209.

(टीप: लढाई – विषमते विरूध्द समतेची या लेखाचा हा विस्तारित भाग आहे.)