साकोलीत जागतिक जल दिवसाची ऐशीतैशी…  — लाखो लिटर पाणी वाया… — अखेर सांगूनही नगरपरिषदेतर्फे उपाय नाहीच…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

           साकोली : २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण साकोलीत कित्येक महिन्यापासून विविध प्रभागात दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे हा संतापजनक प्रकार तलाव वार्ड व गणेश वार्डात पहावयाला मिळत आहे. याबाबत २२ मार्चला जागतिक जल दिनी हा प्रकार या दिनी उघडकीस आणून पाण्याची नासाडी नगरपरिषदेने थांबवावी अशी फ्रिडमकडून मागणी करण्यात आली आहे.

          पाणी म्हणजे जीवन मानल जाते. शरीराला अत्यंत आवश्यक असा हा घटक आहे. पाणी वाचवा जीवन वाचवा या मोहिमेत करोडो रुपये शासन खर्च करीत असते पण साकोलीत या मोहिमेला गालबोट लागून जल दिवसाचा फज्जा उडाला हे या संतापजनक प्रकारातून दिसून आले.

         गणेश वार्ड क्र. २ दिपक थानथराटे यांच्या घरासमोर पाण्याचे पाईप महिन्यापासून लीक आहे. नगरपरिषदेला माहिती दिली व त्यांनी येऊन बघितले पण त्या लीक पाईपची दुरुस्ती केली नाही. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

           दूसरा प्रकार तलाव वार्डात कितीतरी महिन्यांपासून इलेक्ट्रॉनिक बोअरवेलचे दररोजच हजारो नाही तर लक्ष आणि अब्ज लिटर पाणी वाया गेले. या संतापजनक प्रकारावर नगरपरिषदेचे का लक्ष नाही असा सवाल फ्रिडमचे किशोर बावणे व आशिष गुप्ता यांनी केला. तातडीने या अति गंभीर प्रकारावर लक्ष देऊन ही दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी थांबवावी.

          २२ मार्च जागतिक जलदिन दिवशी फ्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर बावणे, दिपक थानथराटे, निखिल तनवाणी, भूषण बावणे, सतीश नंदुरकर, प्रज्योत ब्राह्मणकर, शैलेश शिंगोर, मयूर सोनवणे, सतीश पवार, रोहित जागीया, सुरेश चचाणे यांनी पाणी वाया चाललेल्या घटनास्थळी येऊन नगरपरिषदेकडे ही मागणी केली आहे.