आळंदीतील ग्रामदेवतेच्यां मंदिरांची भाजपा कार्यकर्त्यांकडून स्वच्छता…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार, आळंदी शहर भाजपाच्यावतीने आळंदी येथील ग्रामदैवत मंदिराची आज स्वच्छता करण्यात आली. या अभियानात आध्यात्मिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक हभप संजय महाराज घुंडरे पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

             पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन अयोध्या मोहिमेअंतर्गत आपल्या परिसरातील सर्व मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार भाजपा शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी आळंदीतील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान हाती घेतले.

              ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिर, हजेरी मारुती मंदिर, गजान्तलक्ष्मी मंदीर, शिताळादेवी मंदीर, खंडोबा मंदिर, पितळी गणपती मंदीर अशी अनेक मंदिरे भाजपचे कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. या कार्यात ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, संदीप नाईकरे पाटील, महिला मोर्चाच्या अध्यक्षा संगीता फपाळ, मीना चव्हाण, उपाध्यक्ष चारुदत्त प्रसादे, संकेत वाघमारे, युवा मोर्चा शहराध्यक्ष वासुदेव तुर्की, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष भागवत काटकर, तालुका सरचिटणीस आकाश जोशी, संघटन सरचिटणीस ज्ञानेश्वर बनसोडे, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

             देशभरात मंदिर स्वच्छता अभियान २१ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार असून, आळंदी शहरातील विविध भागातील मंदिरांची भाजपाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता करावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी केले आहे.