ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे डिजिटल शेती अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

          युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली तर्फे ग्रामीण भागातील स्वयंसेवक/विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शेतीविषयक प्रायोगिक शिक्षण कार्यक्रम (ELP) सुरू केला जात आहे. यात रा.से.यो. स्वयंसेवकांची डिजिटल पीक सर्वेक्षण आणि शेतकऱ्यांच्या e-KYC प्रक्रियेत सक्रिय सहभाग असेल, ज्यामुळे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीचे आधुनिकीकरण करण्यास मदत होईल.

           ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे सर्वाधिक विद्यार्थ्यांपर्यंत या कार्यक्रमाचा प्रसार करण्यासाठी दिनांक 22 फेब्रुवारी 2025, रोज शनिवारला “माय भारत आउटरीच प्रोग्राम फॉर ELP इन डिजिटल ॲग्रीकल्चर” हा कार्यक्रम दिलेल्या सादरीकरणाच्या आधारे आयोजित करण्यात आली.

         निर्देशानुसार या उपक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी महाविद्यालयातून दिलराज सिंग अंधरेले आणि वैभव बारेकर या रा.से.यो स्वयंसेवकांना “माय भारत यूथ ॲम्बेसेडर” म्हणून निवडण्यात आले. तसेच या दोघांनी दिलेल्या सादरीकरणाच्या सहाय्याने महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांना डिजिटल शेती अभियानाच्या प्रमुख वैशिष्ट्ये आणि माहिती समजावून सांगितले.

           डिजिटल शेती अभियान (Digital Agriculture Mission) हा राष्ट्रीय उपक्रम असून डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI) विकसित करण्यासोबतच शेतकऱ्यांसाठी डिजिटल सेवा सक्षम करतो. शेतकरी नोंदणी व ई- केवायसी भारताच्या ॲग्री स्टॅकचा महत्त्वाचा भाग आहे, ज्यामुळे जमीन धारणा, पिकांचे प्रकार, शेतकऱ्यांची माहिती यांचा समावेश असलेला डेटा संकलित केला जातो आणि शासकीय योजनांचा लाभ सहज मिळतो.

          तसेच डिजिटल पीक सर्वेक्षण हा मोबाईल-आधारित सर्वेक्षण असून, जीओ-फेन्सिंग आणि उपग्रह इमेजिंगच्या माध्यमातून थेट पीक डेटा संकलन होते, ज्याचा उपयोग विविध हितधारकांसाठी केला जातो.

            या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले, रा.से.यो कार्यक्रम अधिकारी डॉ. बिजनकुमार शील, तसेच महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.