आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी आदेश प्रमाणपत्राचे वाटप. — प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन महोत्सव सोहळा संपन्न.

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशातील नागरिकांना पक्के घरकुल देण्याचे काम करीत आहेत.सर्वांच्या आशिर्वादामुळे मला तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी मिळाली.विदर्भातून सर्वात जास्त चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत मोठ्या संख्येने घरकुल मंजूर झालेले आहे.

          टप्पा दोन अन्वये ६ हजार ६६९ घरकुल मंजूर झाले आहे.महायुती भाजप राज्य शासनाने २० लक्ष घरकुल मंजूर केले असताना १० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता देत आहे. 

       चिमूर तालुक्यात सिमेंटचे पक्के आणि हक्काचे घर मिळवून देण्याचे काम करायचा आहे.घरकुल साठी रेती ची आवश्यकता असल्यामुळे रेती मिळवून देण्याची परवानगी मिळवून देण्यात येईल असे सांगत आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी घरकुल संदर्भात तक्रारी येणार नाही याची पस प्रशासनाने काळजी घ्यावी असी अपेक्षा व्यक्त केली.

        ग्राम विकास विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिप चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती चिमूर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनचा महोत्सव सोहळ्या निमित्त २२ फेब्रुवारीला अभ्यकर मैदान सभागृहात झालेल्या घरकुल धारकांच्या सभेत आमदार बंटीभाऊ भांगडिया बोलत होते.

        यावेळी भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे,पस माजी सभापती प्रकाश वाकडे,भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पलीवार,भाजप किसान नेते एकनाथ थुटे,गिरीष भोपे,व्यापारी मंडळ अध्यक्ष प्रवीण सातपुते उपस्थित होते.

        आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन बिडीओ फुलझेले यांनी सत्कार केला.याच सभेत आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे हस्ते पात्र घरकुल लाभर्थ्यांना मंजुरी आदेश प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

        तसेच संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष संजय नवघडे,रमेश कंचर्लावार,श्रेयस लाखे,अमित जुमडे,अरुण लोहकरे,मनी रॉय सुद्धा उपस्थित होते.

       प्रास्ताविक बिडीओ फुलझेले तर संचालन पंधरे यांनी केले. 

 दरम्यान घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम विषयी प्रशिक्षण देण्यात आले.तालुक्यातील घरकुल पात्र लाभार्थी उपस्थित होते.