भारतरत्न माजी शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम यांना दर्यापूर काँग्रेस कमिटीने वाहिली श्रद्धांजली…

युवराज डोंगरे /खल्लार 

           उपसंपादक 

          भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची ६७ वी पुण्यतिथीनिमित्य दर्यापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

             दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या हस्ते मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

         त्यानंतर त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून अब्दुल कलाम आझाद यांना विसरणे कठीण असून त्यांचा कार्यकाल अजय सर्वांना त्यांच्या कार्याची आठवण करून देत असल्याचे मत सुधाकर पाटील भारसाकडे यांनी व्यक्त केले.

           यावेळी प्रामुख्याने सुधाकर भारसाकळे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी दर्यापूर,सुनील गावंडे,सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर,ईश्वर बुंदेले महासचिव काँग्रेस कमिटी अमरावती ग्रामीण, आतिश शिरभाते शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी दर्यापूर यांच्यासह काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

         यावेळी असलम मंसूरी,ऍड निशिकांत पाखरे,नितीन गावंडे,निळकंठ साखरे,मनोज बोरेकर,प्रकाश चव्हाण, सुभाष पाटील गावंडे,दिलीप चव्हाण,सिकंदर खा.बबलू कुरेशी,मधुकर घाडगे,सुरेंद्र कडू,कालू भाई,जम्मू पठाण, मंगल बुंदिले,रामेश्वर चव्हाण,सुदेश सिंह ठाकुर,यश अहेर, नंदू गावंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.