सोमणपल्ली बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक सोमणपल्ली असे नामांतर करून सन्मान करा… — आझाद समाज पार्टी गडचिरोली यांची मागणी…

ऋषी सहारे 

   संपादक

दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी सोमनपल्ली येथील बस स्थानकावर संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयक आक्षेपार्ह लिखाण करून जिल्ह्यातीलच नव्हे तर देशातील तमाम आंबेडकरी समूहाच्या भावना दुखावलेले आहेत आणि आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झालेला आहे..

             त्यामुळे या अवमानाचा सन्मानात रूपांतर करण्यासाठी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अवमान करणाऱ्या तीन मानसिकतेला धडा शिकवण्यासाठी त्याच बस स्थानकाला “महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक सोमनपल्ली” अशी नामांतर करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जाहीरपणे सन्मान करावा अशी मागणी आझाद समाज पार्टी गडचिरोली व आष्टी वतीने करण्यात येत आहे. 

         यासोबत सदर प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा देण्यात यावी ही सुद्धा मागणी करण्यात येत आहे. 

          सदर मागणीचे निवेदन चामोर्शी तालुक्याचे एस डी पी ओ माननीय अजय कोकाटे यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय चामोर्शी यांच्याकडे सादर करण्यात आले. 

           निवेदन देते वेळी आझाद समाज पार्टी गडचिरोली व आष्टी येथील राज बनसोड जिल्हाध्यक्ष, विवेक खोब्रागडे युवा जिल्हाध्यक्ष, प्रकाश बनसोड, धनराज दामले, सतीश दुर्गमवार, प्रतीक डांगे, सिद्धांत भडके, निखिल कोपरे, हरीश शेडमाके,अश्विन निमरड, बनतेस निमसरकार,सूर्यकांत चांदेकर आधी असंख्य कार्यकर्त्यांसहित सोमनपल्ली येथील असंख्य रहिवासी उपस्थित होते.