कॅप्टन कुणाल गायकवाड पुरोगामी पक्षाकडून अमरावती लोकसभा निवडणुक लढविणार….

युवराज डोंगरे/खल्लार 

        उपसंपादक

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे खंदे समर्थक,बाबासाहेबांच्या चळवळीतील सरसेनापती व पाईक असलेले पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड हे पुरोगामी पक्षाकडून अमरावती लोकसभा निवडणुक लढविणार आहेत.

             अमरावती लोकसभा मतदार संघ अनुसूचित जाती करीता राखीव मतदार संघ आहे.अमरावती जिल्हा हा आकाराने मोठा असल्याने जिल्ह्याचा काही भागाचा समावेश हा वर्धा लोकसभा मतदार संघात होतो. अमरावती लोकसभा मतदार संघात अमरावती, बडनेरा, मोर्शी, तिवसा, दर्यापूर, अचलपूर, मेळघाट,चांदुर रेल्वे या विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

            अमरावती लोकसभा मतदार संघातील मेळघाट वगळता उर्वरित विधानसभा मतदार संघात दलित मते मोठ्या प्रमाणावर आहेत. दलितांची गठ्ठा मते अमरावती लोकसभा खासदार निवडून आणण्यास निर्णायक ठरतात मात्र अमरावती लोकसभेसाठी रा सु गवई वगळता आतापर्यंत एकही आंबेडकरी विचारांचा खासदार निवडून गेला नाही.

              रा. सु.गवई हे 1998 साली या मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांचा कार्यकाळ हा 13 महिन्यांचा होता. त्यांनंतर मात्र कोणीही चळवळीशी संबधित नेता अमरावतीतून लोकसभेत जाऊन दलितांच्या प्रश्नावर बोलताना दिसला नाही.

              सध्या संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे हे संपूर्ण देश बघत आहे,तर संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी अमरावतीकर जनतेला आंबेडकरी विचार जनसामान्य नागरिकांपर्यंत गेले पाहिजेत. त्यांच्या समस्या,अडचणी सोडविल्या पाहिजेत या निस्वार्थी भावनेतून कॅप्टन कुणाला गायकवाड हे पुरोगामी पक्षाकडून अमरावती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अमरावती लोकसभा मतदार संघातील आंबेडकरी चळवळीतील नागरिकांनी कॅप्टन कुणाल गायकवाड मतदान करुन लोकसभेत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.