शिवजयंतीच्या पर्वावर माता रमाई अभ्यासिका वर्गाचे उद्घाटन…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

             चांदुर बाजार तालुक्यातील जवळा येथे शिवजयंतीच्या पर्वावर माता रमाई अभ्यासिका वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.

           सर्वप्रथम शिवजयंती साजरी करुन त्याच अनुषंगाने गावातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी माता रमाई अभ्यासिका वर्गाचे उद्घाटन करुन शैक्षणिक उपक्रमात प्रथम आलेली विद्यार्थ्यांनी कु जिजाई सोपान ठाकरे, द्वितीय क्रमांक प्राप्त कु आनंदी भुषण ठाकरे व तृतीय क्रमांकावर असलेली कु राजनंदिनी प्रविण अढोर या विद्यार्थ्यांनीचा यावेळी गावातील सरपंच,उपस्थित मान्यवर, ग्रा पं सदस्य, व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

            सेवनिवृत पोलिस अधिकारी यांच्याकडून अभ्यासिका वर्गास पुस्तके दान

           अमरावती ग्रामिण पोलिस खात्यातील सेवानिवृत्त स पो उपनिरीक्षक राजु अण्णाभाऊ विधळे यांनी माता रमाई अभ्यासिका वर्गास दिड लाख रुपयांचे विविध पुस्तके दान दिली त्यांचाही यावेळी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.