अबोदनगो सुभाष चव्हाण
तालुका प्रतिनिधी चिखलदरा
दखल न्युज भारत
चिखलदरा :- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त, डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रुरल यांचा तृतीय वर्धापन दिन, शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा, टेंब्रुसोंडा येथे नुकताच संपन्न झाला.
ज्यामध्ये “शोध तुमच्यातील वक्त्याचा” वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. ज्याचा मुख्य उद्देश, मेळघाटातील विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व आणि संभाषण कौशल्याचा विकास व्हावा, विचार अभिव्यक्ती करीता व्यासपीठ उपलब्ध व्हावे व वैचारिक क्षमतेला गती मिळावी हा संस्थेचा प्रामुख्याने प्रयत्न होता. सदरील सामाजिक संस्था मागील तीन वर्षांपासून विविध माध्यमातुन सामाजिक कार्य करीत आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, स्वास्थ, पर्यावरण आणि ग्रामीण विकास यांचा समावेश आहे.
सदरील, वक्तृत्व स्पर्धेमध्ये गट “अ” मधून, प्रथम पुरस्कार संध्या कासदेकर, व्दितीय वैदिका मोरे व तृतीय पुरस्कार पूजा मावसकर हिने मिळविला. तसेच गट “ब” मधून प्रथम पुरस्कार मोहिनी शिवहरे, द्वितिय कल्याणी किल्लेदार तर तृतीय पुरस्कार विद्या पालवे हिने मिळविला. याचबरोबर लोकनृत्य आणि लोकगीत सुद्धा सदरील कार्यक्रमामध्ये घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा, मुख्याध्यापिका वाकोडे मॅडम, प्रमुख अतिथी, डॉ. पिंपळकर सर वैद्यकीय अधिकारी टेंब्रुसोडा, शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळेतील शिक्षक रुंद तसेच गावातील गणमाननिय नागरीक व डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रुरल संस्थेचे गणमाननिय सदस्य गजा भुसूम, अतुल मामनकर, रविंद्र आठोले, लखन कोगेकर, पंकज जगदेव आणि श्याम बछले कार्यक्रमाला उपस्थीत होते.
कन्या आश्रम शाळेतील माननीय, कडू मॅडम यांनी संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.