युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
खल्लार नजिकच्या मौजे वडूरा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 23 अंतर्गत तालुका कृषी अधिकारी दर्यापूर यांचे मार्गदर्शना खाली कृषी सभेचे आयोजन करण्यात आले.
सभे दरम्यान विशाल देशमुख यांनी तृणधान्य चे आरोग्यतील महत्व तसेच तृणधान्य लागवड, उत्पादन वाढ बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तद्नंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेततळे निर्मिती करणे, शेडनेट उभारणी, सेंद्रिय खत निर्मिती करणे, शेतकरी गट करिता विविध योजना व अनुदान ह्या बाबत माहिती दिली. तसेच अशोक राणे यांनी प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत योजना उद्देश, आर्थिक मापदंड आणि कृषी पायाभूत सुविधा निधी बाबत चर्चा करण्यात आली. सभे करिता अध्यक्ष बाबुरावजी नितनवरे सरपंच, तसेच उपसरपंच सौ प्रणिताताई नांदने, ग्राम पंचायत सदस्या सौ जयश्रीताई बोबडे, सौ जयश्रीताई भोरखडे, सौ लताताई डाखोडे आणि श्री बी एस बांते ग्रामसेवक, अतुल पेढेकर, गजानन सगने, गौरव सगने कार्यक्रम करिता उपस्थित होते. भूषण खंडारे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.