युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
नजिकच्या गौरखेडा येथील मिलिंद विद्यालयात वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती संस्थेचे सचिव क्षितिज अभ्यंकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद विद्यालय गौरखेडा शाळा समिती सभासद सुधाकर धुरंदर ,विद्यालयाचे मुख्याध्यापक वासुदेव भांडे ,पालक प्रतिनिधी किशोर वंजारी ,रणधीर चक्रे, सौ. गवईताई ,विनोद पंडित ,दीपक कावरे, सुभाष इंगळे , मनीषा गावंडे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांचे हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते वर्ग दहावीची विद्यार्थिनी भूमिका श्रीकृष्ण सगणे कडून प्राप्त जिजाऊ मा साहेब यांच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या भाषणांनी संपूर्ण सभागृह भावविभोर झाला होता अनेक विद्यार्थ्यांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते. कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवरांनी आपले आशीर्वादरुपी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना इच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक वासुदेवराव भांडे यांनी यांनी तर आभार प्रदर्शन दीपक कावरे यांनी व कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे शिक्षक अमित वानखडे यांनी पार पाडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक पुरणप्रकाश लव्हाळे ,प्रशांत वानखडे , अमोल बोबडे, दीपक रहाटे ,संजय आठवले, आनंद खंडारे व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले घेतले .कार्यक्रमाची सांगता विद्यालयाचे शालेय गीत गाऊन करण्यात आले.