सखी वन स्टॉप सेंटर योजना आणि कौंटुबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत मार्गदर्शनपर जनजागृती कार्यक्रम संपन्न…

ऋषी सहारे

   संपादक

गडचिरोली :- कुटुंबात व समाजात महिलांचे अधिकार व हक्क अबाधित रहावे आणि स्त्रीयांना होणाऱ्या विविध हिंसापासुन संरक्षण मिळावे याकरीता जनमानसात प्रचार प्रसिध्दी व्हावी तसेच संकटग्रस्त महिला व मुलींकरीता केंद्र पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर, महिला सक्षमीकरण केंद्र, महिला हेल्प लाईन १८१ योजनेच्या माहितीकरीता दिनांक १७/०१/२०२५ ला स्थळ किसान भवन, कुरखेडा येथे ठिक २.०० वाजता मार्गदशनपर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.

            सदर कार्यक्रमाकरीता श्रीमती. आर. बी. रहाटे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, कुरखेडा गुडधे मॅडम पर्यवेक्षिका, बांबोळे मॅडम पर्यवेक्षिका, पुरते मॅडम पर्यवेक्षिका यांची विशेष उपस्थिती होती.

         कौटुंबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ या अधिनियमाची गरज का भासली व सदर कायद्याची आवश्यकता किती महत्वाची आहे याबाबत ओमप्रकाश नेवारे, संरक्षण अधिकारी, कुरखेडा यांनी मार्गदर्शन केले.

          तसेच सखी वन स्टॉप योजना, महिला सक्षमीकरण केंद्र, महिला हेल्प लाईन १८१. यशस्वीनी पोर्टल, स्त्री शक्ती पोर्टल याबाबत अतुल कुनघाडकर, आय. टी. पर्सन यांनी माहिती दिली. सोबत कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता लोमेश गेडाम यांनी मदत केली.

          सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश भांदककर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली तसेच केंद्र प्रशासक, सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली यांचे मार्गदर्शनात पार पडले.