नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली : माजी आमदार स्व. मार्तंडराव पाटील कापगते स्मृति प्रित्यर्थ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणमान्य व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जांभळी/सडक येथे ( २२ जानेवारी ) ला या सोहळ्याला विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
मार्तंडराव पाटील कापगते महाविद्यालय जांभळी सडक व रामाजी कापगते विद्यालय बोदरा आणि स्व. मार्तंडराव पाटील कापगते स्मृती प्रतिष्ठानतर्फे या आदरांजली कार्यक्रमात उदघाटक जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, रा.कां.जि.अध्यक्ष गंगाधर परशुरामकर, अतिथी जि.प.सभापती मदन रामटेके, शितल राऊत, पं.स.सभापती गणेश आदे, सरपंच विलास नंदूरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश सुर्यवंशी, सा. कार्यकर्त चंद्रकांत वडीकार, डॉ.वामन डोंगरवार, पोलीस पाटील संघ राज्य उपाध्यक्ष भृंगराज परशुरामकर, यशोदा कापगते, जासवंत कापगते, परशुराम लांजेवार आदी मंचावर उपस्थित होते. सोहळ्यात सत्कारमुर्ती ज्येष नागरीक पुरस्कार रेवाराम तिडके गुरूजी, रेवाराम कठाणे, शेतकरी पुरस्कार ताराचंद लंजे, रामचंद्र कापगते, दामोधर कापगते, शिक्षण पुरस्कार रामकृष्ण चाचेरे, दयाराम समरीत, बारीकराम गडपायले, वैद्यकीय महिला पुरस्कार डॉ. प्रतिभा राजहंस यांचा मानचिन्ह पदक देत जाहीर सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सोबतच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही संपन्न झाला. कार्यक्रमात प्रास्ताविक प्रतिष्ठान सचिव होमराज पाटील कापगते यांनी केले. मान्यवरांनी आपल्या भाषणात माजी आमदार स्व. मार्तंडराव पाटील कापगते यांच्या स्मृतींना उजाळा देत मार्तंडबापूंचे कार्य हे राजकीयसोबतच मुलांच्या उच्च शिक्षणाकडे व प्रगतीकडे होती. गावोगावी त्या काळी स्व. मार्तंडरावबापू स्वत: सहका-यांसोबत जात घरोघरी कुणी बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सतत झटून ते स्वप्न अखेर पूर्ण करून दाखविले असे आठवणींना उजाळा देत प्रतिपादन केले. स्मृती सोहळ्याला संचालन प्राचार्य अर्चना सार्वे व रूपेश कापगते यांनी केले, तर आभार सहसराम बन्सोड यांनी मानले. सदर शाळेत स्नेहसंमेलनासोबतच स्मृति सोहळा यशस्वी करण्यासाठी स्व. मार्तंडराव पाटील कापगते स्मृती प्रतिष्ठानचे नानेश्वर गौपाले, सहसराम बन्सोड, परशुराम लांजेवार, अर्चना सार्वे, ज्ञानेश्वर मांढरे मार्तंडराव पाटील कापगते महाविद्यालय जांभळी सडक, रामाजी कापगते विद्यालय बोदरा येथील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारीगण, आणि दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी अतुल्य योगदान दिले.