नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली : जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्र.०१ ( सेमी इंग्लिश ) गणेश वार्ड साकोली येथील ब्रिटीशकालीन व जिल्ह्यातील दूस-या क्रमांकाची मुख्य केंद्र शाळेत तीन दिवसीय स्नेहसंम्मेलनाचा समारोप ( २१.जाने.) ला संपन्न झाला.येथे बक्षिस वितरण सोहळ्यातही लहान बालकांनी महाराष्ट्रीयन संस्कृती वेषभुषेत नृत्यासोबतच अतुल्य कलाकृती सादर करताच अतिथींकडून बालकांवर बक्षिसांचा वर्षाव झाला.
येथे शनि. ( २१.जाने.) बक्षिस वितरणप्रसंगी किरण आनंद परशुरामकर, हेमंत भारद्वाज, प्रकाश कोवे, लीना चचाने, से.नि.उच्च श्रेणी मुख्याध्यापक रेवाराम तिडके, किशोर बावणे, रवि भोंगाणे, भोजराम बांगळकर, ज्योती गजापूरे, भुवन कापगते, आशिष चेडगे, कुंदा रामटेके, भारती बोरकर, राजेश कोवे, एन.जी.घरत, भुमिता आगाशे, रामदास आगाशे व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या या स्नेहसंमेलनात मुलींचे लेझीम पथक, विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, एकांकिका, नकला, हळदीकुंकू, रांगोळी स्पर्धा, गौरव गीते, प्रश्णमंजूषा, चालता बोलता, अंताक्षरी, खेळोत्तेजनात कबड्डी, खो-खो, संगीत खुर्ची असे सामने घेण्यात आले. सत्कार समारोहात बालरोगतज्ज्ञ डॉ.नितीन गुप्ता, गटविकास अधिकारी के.डी.टेंभरे, फ्रिडम युथ फाऊंडेशनचे किशोर बावणे, सामाजिक कार्यकर्ता आशिष गुप्ता या चार आश्रयदातेंचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. संपूर्ण विविध स्पर्धांमधे सहभागी विद्यार्थ्यांना अतिथींकडून बक्षीसांची लयलूट करण्यात आली. संचालन शिक्षक आर.आर. बांगळे व टि.आय. पटले यांनी केले. या सर्व वार्षिक स्नेहसंमेलनात मुख्याध्यापक डि.डी. वलथरे, शिक्षक एम.व्ही. बोकडे, कार्तिक साखरे, आर.एल.बिसेन, यमंता वलथरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश कोवे, उपाध्यक्ष लिना चचाने, सदस्यगण हेमंत भारद्वाज, आशिष चेडगे, अमित लांजेवार, सचिन डुंभरे, अजय कावळे, चित्रलेखा नंदेश्वर, वंदना रंगारी, सारिका कापगते, त्रिशिला जव्हेरी, छनूताई मडावी, रेश्मा कोवे, कविता बावणे, विद्यार्थी प्रतिनिधी आर्यन कोवे, मयूर निंबेकर, विद्यार्थीनी प्रतिनिधी डिम्पल कापगते, दिव्या आगाशे यांनी अथक परिश्रम घेतले. सदर ३ दिवसीय स्नेहसंम्मेलनाला सर्वश्री आश्रयदाते, संस्कार भारती महिला चमु, साकोली मिडीया नेटवर्क, गणेश मंदिर चौक व्यापारी बंधू, पोलीस ठाणे व होमगार्ड कर्मचारी, गणेश वार्ड निवासी, विद्यार्थ्यांच्या भोजनकार्यात विनामुल्य सेवा ओम गणेशाय नमः कॅटरर्स गणेश देशमुख यांनी सेवा दिली. सरतेशेवटी आभार शिक्षक टि. आय. पटले यांनी केले.