ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या साकोली शाखेत नागपूर विभाग प्रमुख मलिक यांनी ( गुरू. १९ डिसें.) ला भेट दिली. या भेटी मागचा मुख्य उद्देश बिमा सखी योजनेत जास्तीत जास्त बिमा सखी करण्याचा होता.
प्रधानमंत्री बिमा सखी योजनेची सुरुवात ०९ डिसेंबर पासून झाली आहे. त्यामध्ये सर्वात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आणि महिलाना विमा व्यवसायात बिमा सखी योजनेच्या माध्यमातून आणण्यात साकोली शाखेतील (सी एल आय ए) पुजा नरेश कुरंजेकर यांनी प्रथम स्थान प्राप्त केल्याबद्दल नागपूर विभाग प्रमुख मलिक यांच्या हस्ते पुजा नरेश कुरंजेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी साकोली शाखेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.