कलापथकाच्या माध्यमातून स्वच्छतेची जनजागृती कार्यक्रम…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत 

          नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन स्वछता महाराष्ट्र अभियान (नागरी) यांच्या वतीने स्वच्छतेचे महत्व कलापथकाच्या माध्यमातून साकोली येथे बस स्टॉप, पॉलिटेक्निक कॉलेज रोड, लाखांदूर फाटामध्ये स्वछतेचे महत्व कलापथकाच्या माध्यमातून सांडपाण्याचे व्यवस्थापन, ओला कचरा, सुका कचरा ,घातक कचरा, नगर परिषदेच्या घंटा गाडीतच टाकला पाहिजे, नालीत कचरा टाकू नये, पॉलिथिनचा वापर करू नये असे गीतगायन , पथनाट्यच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आले. 

               सोबतच उस्मानाबाद संनशाईन कंपनीच्या वतीने चित्रकरण दाखविण्यात आले..

         पथनाट्य टीम मध्ये प्रबोधनकार मनोज कोटांगले, भावेश कोटांगले, प्रल्हाद भुजाडे, संदीप कोटांगले, तन्वी कोटांगले, अर्चना कान्हेकर, सुलतान शेख, विजु राऊत, तेजस कोटांगले यांनी सादरीकरण केले.