उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक..
चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा शिवणपायली येथील कुमार लखन अंबादास पोईनकर यांच्या गंभीर अशा घातपात-अपघात मृत्यू प्रकरणाची चिमूर पोलिसांनी त्यांच्या असंवेदनशील भुमिकांन्वये टर उडविली असल्याने श्री.देवानंद अंबादास पोईनकर यांनी सदर घातपात-अपघात मृत्यू प्रकरणाची वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.
चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष बकाल यांनी शिवणपायली घातपात-अपघात मृत्यू प्रकरणाला सुरुवाती पासूनच बेदखल केले असल्याचे मृतक कुमार लखन अंबादास पोईनकर यांच्या नातेवाईकांना लक्षात आले.
घातपात-अपघात मृत्यू प्रकरणाचे पुरावे नष्ट करणे गंभीर बाब आहे.असे असताना चिमूर पोलिस चुप बसलेले आहेत.यामुळे चिमूर पोलिसांची साठगाठ आरोपींसोबत झाली असल्याची खात्रीपूर्वक शंका सुध्दा कुमार लखन अंबादास पोईनकर यांच्या नातेवाईकांना आहे.
चिमूर पोलिसांच्या नाकार्तेपणामुळे ट्रॅक्टर मालक सुमीत पालकदास बोरकर ट्रॅक्टर,चालक चंद्रशेखर नारायण तुमराम आणि इतर सर्व मजूर छाती काढून मोकाट फिरत असल्याची बाबच चिमूर पोलिसांवर शंका निर्माण करणारी आहे.
चिमूर पोलिसांकडून मौजा शिवणपायली येथील कुमार लखन अंबादास पोईनकर यांच्या घातपात-अपघात मृत्यू प्रकरणाला न्याय मिळणार नाही आणि आरोपींना अटक केली जाणार नाही असे लक्षात आल्याने मृतकाचे मोठे भाऊ श्री.देवानंद अंबादास पोईनकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,राष्ट्रीय मानवाधिकार आयोग दिल्ली/भोपाल,यांच्याकडे सुध्दा तक्रारी पाठविण्यात आलेल्या आहेत.