
भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
पंचायत समिती धानोरा अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयास अनुसरून मोहली येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.उदय थुल जे एस पी एम कॉलेज धानोरा यांच्या अध्यक्षते खाली विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटक मनोहर पाटील पोरेटी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या हस्ते झाले.
यावेळेस विनोद लेंनगरे माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली मंचावरअंबिका ताई पुंगाटे सरपंच ग्रामपंचायत मोहली रामदास कुमोटी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मोहली गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे मुक्तेश्वर कोमलवार सहाय्य गटविकास अधिकारी पंचायत समिती धानोरा निखिल बाबर कृषी अधिकारी पंचायत समिती धानोरा दिनकर नरोटे मुख्याध्यापक मोहली आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व मान्यवरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. मनोहर पोरेटी यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धांना न बाळगता विज्ञानाचा विकास धरावा असे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून डॉ उदय थुल यांनी व्यासपीठा वरून विचार व्यक्त करताना विज्ञान हा अभ्यासाचा विषय नाही तर आत्मसात करण्याचा विषय आहे. असेच विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ कार्यकारांनाधिष्ठ असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्याचे फलित म्हणजेच विज्ञान व विज्ञान ही एक पद्धतशीर व कठोर शिस्त असलेले ज्ञान शाखा आहे विज्ञानात चाचणी करण्यायोग्य गृहीतके तपासून ते स्वीकारण्यास योग्य वाटल्यास व गृहिताच्या आधारावर वास्तव्यात आणखी काय आढळू शकते याचे भाकीत करून जगाबाबतचे ज्ञान विकसित केल्या जाऊ शकते.
आधुनिक विज्ञान सामान्यता तीन प्रमुख शाखांमध्ये विभागले गेलेले आहे. भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या आहेत. या विज्ञान प्रदर्शनीमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उपविषय मध्ये अन्न आरोग्य आणि स्वच्छता,कचरा व्यवस्थापन,नैसर्गिक शेती, दळणवळण आणि वाहतूक, आपत्ती व्यवस्थापन संसाधन व्यवस्थापन, गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार या विषयावर विद्यार्थ्यांना आपले मॉडेल्स तयार करायचे आहेत. या तालुक्यातील शाळा व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन सुभाष वैरागडे तर देवनात वटी सर यांनी आभार मानले.