गिरगांव येथे पालखी रामधून कार्यक्रम संपन्न… — युवकांनी वाईट व्यसनाकडे दुर्लक्ष करावे आणि गावात स्वच्छता करावी :- राजु देवतळे…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

     पुण्यतिथी प्रसंगी दोन तीन दिवस गावात स्वछता करीत घरासमोर रांगोळी टाकून गाव सजविले तसेच नियमित स्वछता करीत गाव सुंदर करण्याचे सांगत जब की नेकी से जिता तू शराब क्यू पिता ही ओवी सांगत युवक वाईट व्यसनाकडे जात असल्याची खंत व्यक्त करीत वाईट व्यसन सोडून सात्विक जीवन जगले पाहिजे असे सांगत स्वातंत्रसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गुलामगिरी विरुद्ध आवाज पुकारले होते.

                   जातीभेद विसरून सतगुण साथी होण्याचे सांगितले. आपला गाव पंढरपूर समजून गावाच्या विकासासाठी पुढे येण्याचे आवाहन आजीवन प्रचारक राजुभाऊ देवतळे यांनी करीत वाईट व्यसना पासून दूर राहण्याचे संकल्प करण्याचे सांगितले.

                   गिरगांव येथे वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवच्या पालखी रामधूनच्या प्रसंगी मार्गदर्शन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरीचे आजीवन प्रचारक राजुभाऊ देवतळे यांनी गावात स्वच्छता वभक्तीमय वातावरण कसे असले पाहिजे यावर प्रकाश टाकला.

                यावेळी सरपंच गीता बोरकर, पीएसआय लांबट, विनोद बोरकर, रमेश बोरकर आदी मंचावर उपस्थित होते.पालखी रामधून गावातून भजनच्या जय घोष करीत गुरुदेव सेवा मंडळच्या ठिकाणी परत आली. गावातील मुले, मुली, पुरुष, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.